Illegal Beef Seized In Goa Dainik Gomantak
गोवा

Beef Seized In Goa: गोव्यात अवैध तस्करी सुरुच; मोले तपासणी नाक्यावर सुमारे दोन टन 'गोमांस' जप्त

Illegal Beef Seized In Goa: राज्यातील गोमांस तुटवडा लक्षात घेता इतर ठिकाणांवरुन राज्यात तस्करी होत आहे.

Pramod Yadav

मोले: गोव्यात अवैधपद्धतीने गोमांस तस्करी सुरुच असल्याचे आणखी एका घटनेतून समोर आले आहे. मोले तपासणी नाक्यावर सुमारे दोन टन गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे. बेळगावातून गोव्यात वाहतूक केली जात असताना पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Beef Seized

गोव्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस तस्करी होत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. राज्यातील गोमांस तुटवडा लक्षात घेता इतर ठिकाणांवरुन राज्यात तस्करी होत आहे.

Beef Seized

दरम्यान, बेळगावातून गोव्यात १,८०० किलो गोमांस घेऊन येत असलेला टेम्पोची तपासणी मोले तपासणी नाक्यावर करण्यात आली. या तपासणीत पोलिसांना टेम्पोत मोठा गोमांस साठा आढळून आला. पोलिसांनी गोमांस जप्त केले असून, चालकाला अटक केली आहे.

Beef Seized

गेल्या काही दिवसांपूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावर ५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले होते. यात दिल्ली - गोवा गोमांस तस्करीचे कनेक्शन उघड झाले होते. दिल्लीतून गोव्यात अवैध पद्धतीने गोमांस पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले होते. चिकनच्या नावाने गोव्यात गोमांस तस्करी होत असल्याचे समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT