Illegal shop  Dainik Gomantak
गोवा

आके येथील बेकायदा गाडा रातोरात हटवला

पॉवर हाऊससमोर दीनदयाळ योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गाड्यांच्या मधोमध हा गाडा उभारण्‍यात आला होता.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: आके पॉवर हाऊसजवळ उभारण्यात आलेला एक बेकायदा गाडा अखेर रातोरात हटविण्यात आला. याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा गाडा हटविल्याने तो बेकायदा होता असे निष्पन्न झाले, अशी प्रतिक्रिया या गाड्याच्या विरोधात समाजमाध्यमातून आवाज उठविणारे नागरिक अँड्र्यू सिक्वेरा यांनी व्‍यक्त केली आहे.

पॉवर हाऊससमोर दीनदयाळ योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गाड्यांच्या मधोमध हा गाडा उभारण्‍यात आला होता. तेथे एकंदरीत चार ते पाच गाडे गोमंतकीय युवकांना आपला उदारनिर्वाह चालविण्यासाठी सरकारी योजनेतून देण्यात आले आहेत.

यातील काहीजण आपले गाडे स्वतः चालवितात तर काहींनी आपले गाडे भाडेपट्टीवर बिगरगोमंतकीयांना देऊन स्वतः मात्र सरकारी नोकरी (Job) करत आहेत. सरकारी योजनेचा अशा प्रकारे गैरफायदा घेणाऱ्यांवरही त्‍वरित कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

POP Ganesh Idols: बंदी असतानाही पीओपीचा वापर! फोंड्यातील गणेशमूर्ती कार्यशाळेवर छापा, मूर्ती जप्त

Rohit-Virat Retirement: विराट-रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? BCCI उपाध्यक्षांचा मोठा खुलासा, म्हणाले, '...गरज नाही'

SCROLL FOR NEXT