Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: कुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय कामगारांना हाताशी धरुन रेती उपसा, राजकीय वरदहस्ताच्या चर्चेने धरला जोर!

Kulem Police Station: मोले पंचायत क्षेत्रातील व कुळे पोलिस स्थानकाच्या हद्दीत काजूमळ येथे दूधसागर नदीवर बेकायदेशीरपणे रेती उपसा करण्याचे काम परप्रांतीय कामगार घेऊन जोरात सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: मोले पंचायत क्षेत्रातील व कुळे पोलिस स्थानकाच्या हद्दीत काजूमळ येथे दूधसागर नदीवर बेकायदेशीरपणे रेती उपसा करण्याचे काम परप्रांतीय कामगार घेऊन जोरात सुरू आहे.

गोवा (Goa) राज्यात बेकायदेशीरपणे रेती उपसा करण्यास बंदी असूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात रेती उपसा व्यवसाय सुरू असून हा व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने चालतो? कुळे पोलिस गप्प का? असे प्रश्‍न जनता करत आहे. या प्रकरणात एका राजकीय व्यक्तीचा आशीर्वाद असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काजूमळ गावात वळसा घालून ओपा-खांडेपारपर्यंत गेलेल्या दूधसागर नदीतील रेती बेकायदेशीरपणे अन्य गावातील लोक येऊन उपसा करीत आहेत. याच नदीवर गेल्यावर्षीच्या रेती उपसा हंगामात जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा करण्यात आला होता. जवळ जवळ शंभर ते २०० ट्रिप्स रेती काढून ती विकण्यात आली होती. स्थानिक लोक कुणी आपल्या घरासाठी रेती काढण्यास गेल्यास कुळे पोलिस कारवाई करतात; पण या ठिकाणी रेती काढणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिस कारवाई करण्यास घाबरतात याचे कारण काय, असा प्रश्नही येथील नागरिकांनी (Citizens) केला.

आज जेव्हा या ठिकाणी स्थानिकांनी भेट दिली तेव्हा परप्रांतीय कामगार नदीतील रेती उपसा करीत होते. या ठिकाणाहून दिवसातून ५-६ ट्रक रेतीची वाहतूक केली जाते. कामगारांनी (Workers) सकाळी उपसा केलेली रेती सायंकाळपर्यंत तेथून हटवली जाते. रेती भरलेले ट्रक गावातून न येता दाभाळला जाण्यासाठी असलेल्या शॉर्टकट रस्त्यातून तातोड ते कोडली-तिस्क मार्गांवरून जात असतात, अशी माहितीही स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

शहरामध्ये दर चढाच!

या परिसरातील विविध झाडांखाली उपसा केलेली रेती साठवून ठेवण्यात आली आहे. नदीतील रेतीला बांधकामात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रेतीने भरलेला एक ट्रिप ट्रक शहरामध्ये ३० ते ३५ हजार रुपयांना विकला जात असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली. नदीच्या काठी रेतीचा ढिगारा केल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: सत्तारीतील भुईपाल येथे अपहरणाचा प्रयत्न

Goa Politics: '60 वर्षे गोव्यावर ठराविक कुटुंबांचीच पकड! फॅमिलीराज संपवणे गरजेचे'; केजरीवालांनी घेतले भाजप, काँग्रेसवर तोंडसुख

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

SCROLL FOR NEXT