Paragliding Canva
गोवा

Illegal Paragliding: केरी पठारावर पुन्हा बेकायदा पॅराग्लायडिंग! एकजण पोलिसांच्या ताब्यात, साहित्य जप्त

Illegal Paragliding At Querim Plateau: केरी येथील पठारावर बेकायदा पॅराग्लायडिंग करणाऱ्या राजू गवंडी (तळवाडा, पेडणे) याला पोलिसांनी ताब्यात घेउन त्याच्याकडून साहित्य जप्त केले.

Sameer Panditrao

Illegal Paragliding At Querim Plateau

मोरजी: केरी येथील पठारावर बेकायदा पॅराग्लायडिंग करणाऱ्या राजू गवंडी (तळवाडा, पेडणे) याला पोलिसांनी ताब्यात घेउन त्याच्याकडून साहित्य जप्त केले. गेल्या महिन्यात या ठिकाणी झालेल्या पॅराग्लायडिंग अपघातात एका पर्यटक युवतीचा मृत्यू झाला होता.

केरी येथील आजोबा मंदिर पठारावर यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदा पॅराग्लायडिंग पर्यटक करत असल्याचे चित्र दिसून येत होते. या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या पॅराग्लायडिंग व्यवसायाला परवाने देऊ नयेत, यासाठी केरी ग्रामसभेमध्ये ठरावही मंजूर करण्यात आला होता.

परंतु गेल्या महिन्यात या ठिकाणी बेकायदा पॅराग्लायडिंग करत असताना पुणे येथील एका युवतीला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी याविरोधात धडक मोहीम उघडली होती.

तरीही २७ रोजी राजू गवंडी हा केरी डोंगर पठारावर पॅराग्लायडिंग करत असल्याची तक्रार आल्यानंतर लगेच पर्यटक पोलिसांनी धाव घेत गवंडी याला ताब्यात घेत सर्व साहित्य जप्त केले. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT