Goa Asgaon Gram Sabha  Canava, Dainik Gomantak
गोवा

Goa Asgaon: आसगावात भूमाफियांविरोधात ग्रामस्थ आक्रमक; नाईट क्लबवर हल्लाबोल

Asgaon Gram Sabha: आसगाव ग्रामसभेत आगरवाडेकर घर प्रकरणाचे तीव्र पडसाद

गोमन्तक डिजिटल टीम

गावात बेकायदा उभारण्यात येणारे नाईट क्लब तसेच राज्यभर गाजलेले आगरवाडेकर घर मोडतोड प्रकरणाचे आसगाव ग्रामसभेत तीव्र पडसाद उमटले. या ग्रामसभेत भूमाफियाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमकता दाखविली. मात्र, सरपंच हनुमंत नाईक यांनी सामंजस्याने विषय हाताळल्याने अनेकदा हातघाईवर आलेले प्रसंग टळले.

यावेळी व्यासपीठावर उपसरपंच सोनिया नाईक, पंचसदस्य राघोबा कांबळी, सचिन गोवेकर, वॉल्टर ब्रिटो, तनया गावकर, अश्विनी पोखरे तसेच पंचायत सचिव राजेश आसोलकर उपस्थित होते.

परप्रांतीय धनाढ्य लोकांकडून गावात बेकायदा उभारण्यात येणारे नाईट क्लब, हॉटेल लॉबीकडून कायद्याचे उल्लंघन करीत रस्त्यावर खुलेआमपणे सोडण्यात येणारे सांडपाणी आणि त्यामुळे गावभर पसरलेली दुर्गंधी, रोगराई या विषयांवर ग्रामसभेत वादळी चर्चा झाली.

यापुढे पंचायत मंडळ ग्रामस्थांच्या बरोबर राहणार असून नवीन हॉटेल्स तसेच मोठ्या प्रकल्पांना बांधकाम परवाने देतेवेळी गावाचे हित लक्षात घेऊनच मंडळाकडून निर्णय घेतले जातील, असे आश्वासन सरपंच हनुमंत नाईक यांनी यावेळी दिले.

रुम्बा नाईट क्लबला दिलेला परवाना हा बार आणि रेस्टॉरंट चालविण्यासाठी दिला होता. नाईट क्लबसाठी नव्हता, असे सांगतानाच खरी परिस्थिती समोर येताच तात्काळ दिलेला परवाना मागे घेतल्याची माहिती सरपंच नाईक यांनी दिली. रुम्बा नाईट कल्बची आमदार दिलायला लोबो यांच्या उपस्थितीत पंचायत मंडळ पुन्हा पाहणी करून अहवाल तयार करणार आहे.

या कामात आसगाव-बादे नागरिक कृती समितीची मदत घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी नागरिक कृती समितीचे पदाधिकारी सुरेंद्र गाड यांनी, गावात शिरकाव करणाऱ्या नाईट कल्चरविरोधात संघटितपणे लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थ चंदन मांद्रेकर, आईन्स्टाईन बार्रेटो, सुरेंद्र गाड, शिवाजी सावंत, मनोज सावंत, अविनाश फोन्सेका आदींनी सभेत भाग घेतला.

घर मोडतोडीवर चर्चा टाळली

आगरवाडेकर कुटुंबीय राहात असलेल्या घराचा मालकी हक्क नेमका कुणाकडे, या प्रश्नावरून ग्रामसभेत बराच गदारोळ झाला. अनेकांनी यावर सविस्तर चर्चा करण्याचे आवाहन केले; परंतु हा मुद्दा ग्रामसभेच्या अजेंड्यावर नसल्याने त्यावर ग्रामसभेत चर्चा करणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT