Illegal Mountain Harvesting  Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Mountain Harvesting: पोरस्कडे येथे बेकायदेशीरपणे डोंगर कापणी; प्रशासन सुस्त

Goa Illegal Mountain Harvesting: याकडे स्थानिक पंचायत तसेच पेडणे तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Illegal Mountain Harvesting: कासुले-पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेला डोंगर कापण्याचे काम सुरू आहे. याकडे सरकारी यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

गेले अनेक दिवस जेसीबीच्या साहाय्याने डोंगर पोखरून माती, दगड हे ट्रकद्वारे नेण्यात आले. याकडे स्थानिक पंचायत तसेच पेडणे तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे.

यावेळी पत्रकारांनी तिथे काम करणाऱ्या कामगारांना डोंगर कापण्याचा परवाना आहे का, असे विचारल्यावर त्यांचाकडे उत्तर नव्हते. खाजने-अमेरे-पोरस्कडे पंचायतीच्या सरपंच प्रीती हळदणकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना डोंगर कापणीचा परवाना पंचायतीने दिला का, असा प्रश्न केला असता पंचायतीने कुठल्याही प्रकारचा परवाना डोंगर कापणीसाठी दिला नसल्याचे सांगितले.

डोंगर कापणीबाबत पंचायतीच्या वतीने पेडणे पोलिस निरीक्षक आणि पेडणे मामलेदार यांना लेखी निवेदन देण्यात येणार आसल्याची माहिती सरपंच प्रीती हळदणकर यांनी दिली. पेडणे मामेलदर अनंत मलिक यांच्याशी संपर्क साधला असता आपण टीसीपी विभागाला कळवतो, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT