Illegal Liquor Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारू तस्करी, शक्कल लढवली पण... 31 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन गुजराती ताब्यात

दारू तस्करी करण्यासाठी ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करून त्यात दारू ठेवण्यात आली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

Illegal Liquor Smuggling From Goa to Gujarat: गोव्यातून विविध राज्यात दारू तस्करी होत असते. येथे स्वस्त मद्य मिळत असल्याने दुसऱ्या राज्यात चढ्या भावाने विकण्यासाठी बऱ्याचवेळा चुकीच्या मार्गांचा अवलंब करून मद्य तस्करी केली जाते.

असाच एक दारू तस्करीचा प्रयत्न बांदा येथे उघडकीस आला आहे. गोव्यातून गुजरातला दारू घेऊन जात असताना पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. दरम्यान, पोलिसांनी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करत, दोन गुजरातींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी प्रदीपकुमार श्रीभगवती प्रसाद व महम्मद शबीर वहिदीभाई इंद्राशी, (दोघेही रा. राजकोट गुजरात) यांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दारू तस्करी करण्यासाठी ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करून त्यात दारू ठेवण्यात आली होती. बेकायदा दारू वाहतुकीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर ट्रकची तपासणी केली असता, त्यात बेकायदा दारूसाठी आढळून आला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 11 लाख 65 हजार 395 रुपयांचा दारूसाठा तसेच, 20 लाख रूपये किंमतीचा ट्रक, असा एकूण 31 लाख 65 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रॉयल स्टॅग, ब्लेंडर स्प्राईड व्हिस्की, मॅजिक मोमेम्ट व्होडकाच्या बाटल्या, ब्ल्यू रिबंड प्रीमियमच्या बाटल्या, ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की, ब्लेंडर स्प्राईड प्रीमियम व्हिस्की, रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्की, स्मिरनॉफ ऑरेंज ट्रिपल, बॅगपायपर क्लासिक व्हिस्की याचा मद्यसाठा आढळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT