Illegal Liquor Smuggling Dainik Gomantak
गोवा

Liquor Smuggling: गोव्यातून अवैध दारु तस्करी सुरुच; झारखंडमध्ये 1,200 बॉक्स मद्य जप्त

Illegal liquor Seized In Jharkhand: गोव्यातून बेकायदेशीरपणे नेणारी दारू अखेर झारखंडमध्ये पकडण्यात आली. त्याआधी दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकने महाराष्ट्र व छत्तीसगडची सीमा ओलांडली होती. झारखंडमधील चैनपूर येथे स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातून बेकायदेशीरपणे नेणारी दारू अखेर झारखंडमध्ये पकडण्यात आली. त्याआधी दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकने महाराष्ट्र व छत्तीसगडची सीमा ओलांडली होती. झारखंडमधील चैनपूर येथे स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली.

झारखंडमधील (Jharkhand) चैनपूर येथे स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. चैनपूर हे झारखंडमधील गडवा जिल्ह्याच्या सीमेला लागून असून, छत्तीसगडशी जोडलेले आहे. इतर अमली पदार्थांसारख्या (जसे की अफू किंवा गांजा) तस्करीपेक्षा बेकायदेशीर दारू सामान्यतः अल्प अंतरावर वाहून नेली जाते. मात्र, गोव्यातून बेकायदेशीरपणे दारू आणण्यात आल्याने तेथील पोलिसही चक्रावले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये नोंदणीकृत असलेला हा ट्रक मार्गरडहा येथील पेट्रोल पंपाजवळ उभा होता. तपासणीदरम्यान १ हजार २०० बॉक्स सापडले, ज्यामध्ये प्रत्येकी १२ बाटल्यांचा समावेश होता, अशी माहिती चैनपूर पोलिसांनी स्थानिक पत्रकारांना दिली आहे.

या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील जितेंद्र यादव या ट्रकचालकाला पलामू जिल्ह्यातील चैनपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्या ट्रकमध्ये अचानक केलेल्या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूचा साठा आढळून आला. हा ट्रक ५ एप्रिल रोजी गोव्यातून निघाला होता आणि महाराष्ट्र (Maharashtra) व छत्तीसगड मार्गे झारखंडमध्ये दाखल झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT