Goa Electricity Department Dainik Gomantak
गोवा

सरकारच गुन्हा करते तेव्हा... गोवा वीज खात्याची मांद्रेत डोंगरकापणी, उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Illegal Hill Cutting: डोंगरकापणी करून उपविभागीय वीज केंद्र उभारल्याबद्दल पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Hill Cutting

मोरजी: जुनसवाडा-मांद्रे किनारी भागात वीज खात्याने बेकायदेशीर डोंगरकापणी करून उपविभागीय वीज केंद्र उभारल्याबद्दल पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी वीज खात्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राज्यात कुठेही बेकायदेशीर डोंगर कापणी होत असेल, तर तलाठ्यांनी त्वरित उपजिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा, असा आदेश सरकारने दिल्यानंतर जुनसवाडा-मांद्रे येथे वीज खात्याने उपविभागीय वीज केंद्र उभारताना या परिसरात डोंगर कापणी केल्याची तक्रार शुभम सावंत यांनी पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

त्यानुसार पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावरून सरकारनेच सरकारला नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता या प्रकरणात कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT