Goa Hill Cutting Canva
गोवा

Bambolim News: गोव्यात मेगाप्रकल्पासाठी डोंगराचा बळी? बांबोळीत पर्यावरणाचे नुकसान, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Bambolim Hill Cutting For Mega Project

पणजी: कालापूर - बांबोळी येथील सर्वे क्रमांक १११ मध्ये पणजीहून बांबोळीकडे जाताना चढणीवर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने रुंदीकरणाच्या नावाखाली परवाने घेऊन मोठ्या प्रमाणात अवैध डोंगरकापणी व खडी उत्खनन करून मेगा प्रकल्पाचे बांधकाम सरकारच्या आशीर्वादानेच सुरू आहे. यामुळे तेथील पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करून परवाने दिलेल्या नगरनियोजन व खाण खात्यांच्‍या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी व प्रकल्पाचे काम बंद करावे,अशी मागणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीद्वारे केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर डोंगरकापणी करून मेगाप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांना गोमंतकियांनी विरोध केल्यानंतर सरकारने सावध भूमिका घेतली आहे. या प्रकल्पांविरुद्ध ठोस कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आश्‍वासने दिली जात नाहीत. भूतानी प्रकल्पाला विद्यमान सरकारने सर्व परवाने दिले असताना ते काँग्रेसच्या काळात दिले गेल्याचा आरोप केला होता. मात्र, भाजपने त्या विषयावर उत्तर देणे बंद केले आहे.

(Bambolim National Highway Widening)

मंत्री राणेच जबाबदार!

गोव्यात वादग्रस्त ठरत असलेल्या प्रकल्पांना नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे हेच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. हे असेच सुरू राहिल्यास गोव्यात मेगाप्रकल्प उभे राहून स्थानिकांना साधनसुविधांपासून वंचित होण्याची पाळी येईल तसेच लोकांना न्याय मिळणार नाही, असे मत सुनील कवठणकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinayak Naik Murder Case: विनायक नाईक हत्या प्रकरण उलगडले! कारवार पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Goa BJP: ' बाहेरून आलेल्यांना भाजपची कार्यसंस्कृती माहित नाही'! पक्षशिस्तीवरुन गोवा प्रदेशाध्यक्षांनी पुढे केले 'कारण'

'नोकऱ्या' जातात कुठे? मंत्री आक्रमक, तरुणाई निराश; 'गोवा सरकार'वर वाढता दबाव

Chapora News : शापोरा समुद्रात मासेमारी बोट उलटली; चौघांना जीवदान

Bicholim Theft Case: चोरट्यांचा धुमाकूळ; डिचोली बाजारातील दुकान फोडले

SCROLL FOR NEXT