Nodal Officer Kashinath Shetye Dainik Gomantak
गोवा

Kashinath Shetye: बेकायदेशीर केबल्सप्रकरणी 2 मोठ्या टेलिकॉम कंपन्यांविरोधात तक्रार, काशिनाथ शेट्येंना जीवे मारण्‍याची धमकी

Kashinath Shetye Threat: वीजखांबावरील बेकायदेशीर फायबर केबल्सबाबत वीज विभागाने दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांविरुद्ध पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वीजखांबावरील बेकायदेशीर फायबर केबल्सबाबत वीज विभागाने दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांविरुद्ध पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. आपल्‍याला जीवे मारण्‍याची धमकी देण्‍यात आल्‍याचे वीज विभागाचे नोडल अधिकारी व कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

विभागाने म्हटले आहे की, या बेकायदेशीर कामांमुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून सरकारला सुमारे ११० कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज विभागाचे नोडल अधिकारी व कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी एजकॉम टेलिकॉम आणि डिजिटल नेटवर्क असोसिएट्स कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध ही तक्रार दाखल केली आहे.

वीज विभागाने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केलेल्या नोटिशीनुसार, कंपन्यांना १० दिवसांच्या आत सर्व बेकायदेशीर केबल्स काढून घेण्याचे आदेश दिले होते.

धमकावण्याचा प्रयत्न सुरूच

तक्रारदार काशिनाथ शेट्ये यांनी असेही आरोप केले आहेत की, ही कायदेशीर प्रक्रिया रोखण्यासाठी काही प्रभावी राजकीय व्यक्तींच्या मदतीने सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्‍यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक आणि मडगाव पोलिस निरीक्षकांकडेही एजकॉम टेलिकॉम, महादेव गोवेकर, एथेरनेट व अन्य काहीजणांवर ही तक्रार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

Liquor Seized In Sindhudurg: गोव्याची दारू बेळगावला नेण्याचा 'प्लॅन' फसला; 64 हजारांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात, सावंतवाडी पोलिसांची कारवाई

..शेवटी गोव्याचा आंबा तो गोव्याचा! तोच खरा बाकीचे सगळे पोरकारी! गोंयकार, आंबे आणि बरेच काही

सालाझारने गोवा हा पोर्तुगालचाच एक ‘ऑफशोर’ प्रांत आहे अशी उठवलेली आवईही कुठल्याही तणावाशिवाय आपण पचवली; ओपिनियन पोलचे कवित्व

SCROLL FOR NEXT