Gomeco Hospital Dainik Gomantak
गोवा

गोमेकॉ इस्पितळाच्या आवाराबाहेर बेकायदा ‘फास्ट-फूड’

खुलेआम विक्री: सांताक्रुझ पंचायतीचे दुर्लक्ष; वाहने उभी करण्यास अडथळे

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाच्या आवाराबाहेर असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली असली तरी या भागातील पार्किंग क्षेत्रात अतिक्रमण करून मोबाईल फास्टफूड वाहने उभी करून व तेथे टेबल-खुर्च्या घालून खाद्यपदार्थाची खुलेआम विक्री केली जात आहे. पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करण्यास अडथळे होत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सांताक्रुझ पंचायतीचे या बेकायदा प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.

या इस्पितळाच्या आवाराबाहेरील बेकायदा फळे-भाजीविक्रेत्‍यांना तसेच काही खाद्यपदार्थांचे गाडे गेल्या वर्षी हटविण्‍यात आले होते. त्यामुळे अनेक वर्षे या ठिकाणी उभे असलेल्या या गाडेधाकरांचा उदारनिर्वाह बंद झाला होता. त्‍यांनी आंदोलन करून तसेच धरणे धरून आपल्‍याला कायदेशीर गाळे देण्याची मागणी केली होती.

स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनीही या गाडेधारकांना पाठिंबा देत त्यांचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला होता. सध्या या गाळ्‍यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तेथे व्यापार पूर्ववत होणार आहे.

टेबल्‍स आणि खुर्च्या मांडून विक्री

इस्पितळाच्या प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या आवारात पार्किंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. इस्पितळाच्या आतील आवारात वाहनांसाठी जागा कमी पडत असल्याने तेथील मंदिरासमोर असलेल्या विक्रेत्यांना तसेच दुकाने हटवण्यात आली होती व ही जागा आता वाहनांसाठी पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पार्किंग क्षेत्रात मोबाईल फास्टफूड वाहन संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत उभे करून ठेवले जात आहे. त्‍यावर कडी म्‍हणजे टेबल्स-खुर्च्या घालून खाद्यपदार्थांची विक्री केली जातेय.

सांताक्रुझ ग्रामपंचायतीचे साटेलोटे?

बांबोळी येथील इस्पितळासमोरील परिसर हा सांताक्रुझ पंचायत क्षेत्रात येतो. या भागातून पंचायतीचे सदस्य येजा करतात. मात्र या बेकायदा सुरू असलेल्या मोबाईल फास्टफूड वाहनावर कोणीच कारवाई करत नाहीत. या विक्रीसाठी आवश्‍यक असलेला परवाना सांताक्रुझ पंचायतीने दिलेला नाही. त्यामुळे पंचायतीचेही यामध्ये साटेलोटे असल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये आहे. याबाबत सांताक्रुझच्या सरपंचांशी संपर्क साधला असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT