Goa Beach Dainik Gomantak
गोवा

गोवा किनारी भागात बेकायदा बांधकामांना 'ऊत'

12 बांधकामांना नोटिसा : पंचायती उदासीन आणि निष्‍क्रिय : स्‍थानिकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

शिवोली: शिवोली मतदारसंघात मोडणारा हणजूण, कायसूव, वागातोरचा किनारी भाग तसेच शिवोली ते शापोरा मच्छीमार जेटीपर्यंतचा शापोरा नदीचा काठ या सीआरझेड कक्षेत येणाऱ्या किनारी भागांत सागरी क्षेत्राच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन करून स्थानिकांबरोबरच परप्रांतीय हॉटेल व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे चालल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत गोवा राज्य सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून या भागांतील एकूण 12 बेकायदा बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शिवोलीतील हुडो किनारा परिसर ते बादे-कायसूव तसेच शापोरा नदीच्या काठावर स्थानिक पंचायत तसेच शासकीय यंत्रणांना अंधारात ठेवून परप्रांतीय हॉटेल व्यावसायिकांकडून अशा प्रकारची बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याबाबतीत स्थानिक पंचायतीकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून कानावर हात ठेवले जातात. तसेच तक्रार आल्यास निश्चितच कारवाई करू अशी उत्तरे देऊन बोळवण केली जाते, असे एक स्थानिक अँथनी डिसोझा यांनी सांगितले. बेकायदा बांधकामांबरोबरच परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. स्थानिक पंचायत मंडळाच्या निष्क्रियतेमुळेच अशा प्रकारच्या बेकायदा कृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप त्‍यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यातील प्रसिद्ध किनारा, पण खाडीचे पाणी मात्र प्रदूषित; काळसर पाण्यामुळे नागरिक, पर्यटक त्रस्त

Bihar Nalanda Stampede: नालंदा हादरले! शीतला देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Goa Theft: फोंड्यात ज्वेलरी शॉपमधून 1.14 कोटींचे सोने लंपास; कर्मचाऱ्यांवरच संशयाची सुई

Penha De Franca: सफर गोव्याची! आपुलकीनं भरलेलं, साध्या लोकांचं गाव 'बिठ्ठोण'

Panaji: पणजी महापौरपदी 'रोहित'च, उपमहापौर 'आगशीकर'; नवनिर्वाचित नगरसेवकांनाही दिली शपथ

SCROLL FOR NEXT