Illegal Construction in Mapusa Dainik Gomantak
गोवा

गावसावाडा येथे शेतजमीन बुजवून थाटले गाळेवजा दुकान

‘खारफुटी’ची कत्तल ः नगरसेवकांच्या तक्रारीकडे पालिकेचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

म्हापसा : गावसावाडा येथील शेतजमीन बुजवून तिथे बेकायदेशीर गाळेवजा दुकान थाटले आहे. यासंबंधी स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसते.

राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक म्हापसा नदीकिनारील खारफुटीची झाडे कापून मोठ्या प्रमाणात ही शेतजमीन बुजविण्यात आली होती. या प्रकरणी वेळोवेळी स्थानिकांनी तसेच विरोधी गटनेत्यांनी आवाज उठविला होता. तरीही म्हापसा पालिका किंवा संबंधितांकडून कारवाई करण्यात आली नव्हती.

मागील महिन्यात या मातीच्या भरारावर एक बेकायदा गाळेवजा दुकान थाटले होते. यासंबंधी स्थानिक नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी पालिका मुख्याधिकारी सीताराम सावळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार, मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या अभियंता विभागाला यासंदर्भात चौकशी करुन अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. तरीही, पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही.

दरम्यान, कनिष्ठ अभियंतामध्ये पालिका क्षेत्र विभागून देण्यात आले आहे. अशावेळी, त्यांनी या बेकायदा प्रकाराची चौकशी करुन पालिका अधिकार्‍यांना अहवाल पाठविण्याची गरज होती व या वीजजोडणीस हरकत घ्यायला हवी होती. मात्र, तसे झालेले दिसत नाही.

‘तक्रार देऊनही वीजजोडणी कशी?’

सध्या या गाळ्याला वीजजोडणी मिळाली असून, त्याठिकाणी मार्बल विक्रीचा व्यवसायही थाटण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली असताना, या बेकायदा गाळ्याला वीजजोडणी मिळाली कशी? असा सवाल स्थानिक नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT