Illegal Construction Dhargal Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction Dhargal: धारगळ पंचायतीकडे अवैध बांधकामाची तक्रार, 'त्या' घरात आमदार प्रवीण आर्लेकर यांचे वास्तव्य

Illegal Construction Complaint Dhargal: धारगळ येथील चोणवाडा परिसरातील सर्व्हे क्र. ४७/१ मधील कथित बेकायदा बांधकामाबाबत धारगळ ग्रामपंचायतीकडे स्थानिकांकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: धारगळ येथील चोणवाडा परिसरातील सर्व्हे क्र. ४७/१ मधील कथित बेकायदा बांधकामाबाबत धारगळ ग्रामपंचायतीकडे स्थानिकांकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धारगळ येथील अर्जुन प्रकाश कानोलकर यांनी १८ जुलै रोजी पंचायत सचिवांकडे सादर केलेल्या तक्रारीत, गिरीश शिवराम सिमेपुरुषकर यांनी संबंधित जागेवर अधिकृत परवानगी न घेता घर बांधण्यात आल्याचा आरोप केला आहे.

तक्रारीत असेही म्हटले आहे की, या घरात पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर गेल्या सुमारे पाच वर्षांपासून वास्तव्यास असून संबंधित घर हे आवश्यक तांत्रिक मंजुरी व बांधकाम परवान्याविना उभारले आहे. तक्रारीच्या प्रती पेडणे उपजिल्हाधिकारी, पंचायत संचालनालय (पणजी), बीडीओ (पेडणे) आणि पेडणे पोलिस निरीक्षक यांनाही पाठवल्या आहेत.

आर्लेकरांचा प्रतिक्रियेस नकार

या संदर्भात आमदार प्रवीण आर्लेकर यांच्‍याशी प्रस्‍तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्‍यांनी प्रतिक्रिया देण्‍यास नकार दिला. सदर तक्रारीबाबत संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गिरीश सीमेपुरुष्कार यांच्याशी संपर्क साधला असता मोबाईल बंद होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT