Assolda Comunidade Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction At Assolda: वाट अडवण्‍यासाठी नागरिकांनी खणला रस्‍ता! असोल्‍डा येथील बेकायदेशीर बांधकाम वाद

Assolda Comunidade Illegal Construction: कोमुनिदादीच्‍या जमिनीत बेकायदेशीर बांधकाम; पंचायतीची कारवाई करण्‍यास टाळाटाळ

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: मालमत्तेच्‍या वादावर असोल्‍डा पंचायतीकडून कुठलाही तोडगा निघू न शकल्‍याने शेवटी स्‍थानिकांनी कोमुनिदादच्‍या जमिनीतून जाणारा रस्‍ता खणून वाट अडविण्‍याचा प्रकार घडला. त्‍यामुळे आता हे प्रकरण उपजिल्‍हाधिकारी कार्यालयात पोचले आहे.

असोल्‍डा येथील कोमुनिदादीच्‍या जमिनीत एकाने बेकायदेशीर बांधकाम केले आहे. हे बांधकाम पाडून टाकावे असा आदेश सत्र न्‍यायालयाने देऊनही पंचायतीने त्‍या बांधकामावर कुठलीही कारवाई केलेली नाही. प्रतिवादी व्‍यक्‍तीने उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे, असा मुद्दा पुढे करुन पंचायतीने या बांधकामावर कारवाई करण्‍यास टाळाटाळ चालवली आहे. याच पार्श्वभूमीवर या बांधकामाला विरोध करणाऱ्या ग्रामस्‍थांनी या जमिनीत जाणारा रस्‍ता खणून टाकल्‍याने या प्रकरणी केपे पोलिस स्‍थानकात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

यासंदर्भात चौकशी करण्‍यासाठी केपे पोलिसांनी शेल्‍डे कोमुनिदादीचे ॲटर्नी संजय राऊत देसाई यांना बोलावून घेतले होते. यावेळी तक्रारदार आणि प्रतिवादीही उपस्‍थित होते. या प्रकरणावर तोडगा काढण्‍यासाठी ते जिल्‍हाधिकारी कार्यालयात वर्ग करण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

बेफिकीर पंचायतीमुळेच ग्रामस्‍थांनी उचलले पाऊल

यावेळी पोलिस स्‍थानकावर हजर असलेले आदित्‍य देसाई यांनी पंचायतीच्‍या अनास्‍थेमुळेच स्‍थानिकांवर अशी कृती करण्‍याची वेळ आली असा आरोप केला. वास्‍तविक हे बांधकाम पाडावे असा न्‍यायालयाने आदेश दिल्‍यानंतर पंचायतीकडून तशी कृती अपेक्षित होती. मात्र पंचायतीने या बेकायदा बांधकामावर कोणतीही कारवाई न केल्‍याने स्‍थानिकांना हा रस्‍ता खणून टाकण्‍याचा पर्याय स्‍वीकारावा लागला, असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripurari Poornima: वाळवंटीला पूर, साखळीत त्रिपुरारी पौर्णिमेची जय्यत तयारी; नौकानयन स्पर्धेला अवकाळी पावसाची भीती?

Rohan Bopanna Retirement: रोहन बोपण्णा वयाच्या 45 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्त, भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'निरोप, पण शेवट नाही...'

Corgao Lake: हर हर महादेव! दिवाळीनिमित्य तळ्यात उभा केला भव्य किल्ला, शिवरायांचा 7 फूट पुतळा

Shreyas Iyer Injury Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, 'बीसीसीआय'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Goa Murder Case: पीर्ण येथील हत्येचं गूढ 15 तासांत उलगडलं, मुख्य आरोपीला अटक; साथीदारांचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT