Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Old Goa construction: जुने गोवेतला ‘तो’ बंगला पाडा! विरोधक आक्रमक; सभापतींसमोर घेतली धाव, कामकाज स्‍थगित

Illegal bungalow in old goa: जुने गोवे चर्च परिसरात अवैधरित्‍या उभारण्‍यात आलेला बंगला सरकारने तत्‍काळ पाडावा, अशी मागणी करत सोमवारी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.

Sameer Panditrao

पणजी: जुने गोवे चर्च परिसरात अवैधरित्‍या उभारण्‍यात आलेला बंगला सरकारने तत्‍काळ पाडावा, अशी मागणी करत सोमवारी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. हा विषय न्‍यायप्रविष्‍ट असल्‍याचा दावा मुख्‍यमंत्री डॉ.सावंत आणि पुरातत्त्‍व मंत्री फळदेसाई यांनी केल्‍यानंतर विरोधकांनी संतप्‍त होत सभापतींपुढे हौदात धाव घेतली. सभापतींनी कामकाज दहा मिनिटे स्‍थगित ठेवले.

आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस यांनी प्रश्‍नोत्तराच्‍या तासाला जुने गोवे चर्च परिसराच्‍या संवर्धनासाठी आराखडा तयार करा, या परिसरात बेकायदा बांधकामे उभी राहू नयेत यासाठी बफरझोन निश्‍चित करा तसेच चर्चमध्‍ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा, अशा मागण्‍या केल्‍या होत्‍या. त्‍यावर बोलताना मंत्री फळदेसाई यांनी जुने गोवेतील चर्च ‘युनेस्‍को’ने जागतिक वारसास्‍थळे म्‍हणून जाहीर केलेली आहेत.

त्‍यामुळे हे चर्च भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्‍या (एएसआय) अखत्‍यारित येतात. गोवा पुरातत्‍व खात्‍यांतर्गत तेथील जे चर्च येतात, त्‍यांचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे काम राज्‍य सरकारकडून सुरू आहे. या परिसरात बेकायदा बांधकामे येऊ नयेत, यासाठी शंभर मीटरचा बफरझोन घालण्‍यात आलेला आहे. संवर्धन आराखड्याबाबत नगरनियोजन खात्‍याशी चर्चा सुरू आहे, अशी उत्तरे दिली.

दरम्‍यान, त्‍याचवेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जुने गोवे चर्च परिसरातील बेकायदा बंगल्‍याचा विषय उपस्‍थित केला. या बंगल्‍याचा विषय अनेक महिन्‍यांपासून राज्‍यात गाजत आहे. तरीही सरकार त्‍यावर कारवाई का करीत नाही, हा बंगला जमीनदोस्‍त का केला जात नाही, असे प्रश्‍न प्रश्‍न केले.

त्‍यावर, मुख्‍यमंत्री डॉ. सावंत आणि मंत्री फळदेसाई या दोघांनीही हा विषय न्‍यायप्रविष्‍ट असल्‍यामुळे बंगल्‍यावर कारवाई केली जात नसल्‍याचे उत्तर दिल्‍याने अधिकच आक्रमक झालेल्‍या विरोधकांनी थेट सभापतींसमोरील हौदात जाऊन घोषणाबाजी सुरू केली. त्‍यामुळे वातावरण तंग झाल्‍याने सभापती तवडकर यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्‍थगित केले. दहा मिनिटांनंतरही विरोधकांनी पुन्‍हा उभे राहत तीच मागणी सुरू केल्‍यानंतर त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करीत सभापतींनी कामकाज सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT