Agassaim Police Goa Dainik Gomantak
गोवा

आगशी येथे बैलाची अवैध वाहतूक, तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी; सात जणांविरोधात गुन्हा

वाहतूक प्रकरणी तक्रारदाराने त्यांना जाब विचारला असता त्याला जीवे मारण्याची धमकी दिली

Pramod Yadav

Agassaim police Goa booked seven persons for Illegal Bull transport: बैलाची अवैध वाहतूक प्रकरणी सात जणांविरोधात आगशी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. प्राण्याला क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वाहतूक प्रकरणी तक्रारदाराने त्यांना जाब विचारला असता त्याला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच, वाहनांतील संशयित आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक वाद आणि झटापट झाली.

गौरीश सत्यविजय नारिंग्रेकर (वय 23) यांनी याप्रकरणी आगशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी हनुमंता कुताकानाकेरी, मालिबुबासाब वाळीकर, एडी डायस, मेलकम पेल्हा, मरियन रॉड्रिग्ज, गुरूदास गावस आणि एक अनोळखी व्यक्ती असे सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गौरीश यांनी अवैध बैल वाहतूक प्रकरणी ट्रक थांबवून त्यातील (GA-03-W-1819) संशयितांना जाब विचारला. तसेच, प्राणी वाहतूकीबाबत वैध परवानगीची विचारणा केली. यावर संशयित आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक वाद झाला तसेच, त्यांच्यात हातापायी देखील झाली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

संशयितांनी तक्रारदाराला शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT