ग्रामस्थ  Dainik Gomantak
गोवा

जमिनीच्या उतार्‍यावरून IIT चे नाव अद्याप हटवले नाही; ग्रामस्थांकडून आंदोलनाचा ईशारा

अद्याप गुन्‍हे मागे न घेतल्‍याने संताप 15 दिवसात सरकारने (Government) गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्र्यांनी (CM) आश्‍वासन देऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजून शेळ-मेळावलीतील लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. त्याशिवाय शेळ-मेळावलीत IIT होणार नाही अशी ग्वाही दिली असतांनाही अद्याप जमिनीच्या उतार्‍यावरून IIT चे नाव काढण्यात आलेले नाही. येत्या 15 दिवसांत आश्‍वासनांची अमलबजावणी न झाल्यास पुन्हा त्याच क्षमतेने आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने शंकर नाईक यांंनी दिला आहे.

आज शेळ-मेळावलीतील कांही नागरीकांनी मुख्यमंत्र्यांसह विविध खात्‍याच्या मुख्यस्थांंना निवेदन सादर करून त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी येथील वन भवनासमोर माध्यमांशी संवाद साधतांना पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी शशिकांत सावर्डेकर, शंकर नाईक, अर्जून मयेकर, सडयो मयेकर उपस्थित होते.

प्रसंगी बोलतांना शशिकांत सावर्डेकर म्हणाले, सरकारने गावातील 40 लोकांवर खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये (crimes) संशयीत म्हणून असणार्‍यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कित्येक दिवसांच्‍या आंदोलनानंतर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी Iरद्द करीत असल्‍याची आणि गुन्हे मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. परंतू, त्यांनी दिशाभूल चालविली आहे.

अनेकवेळा त्यांची भेट घेत घेतली, प्रत्येक संबंधीत खात्याला निवेदने दिली. पण, त्याबाबत एकदाही प्रत्‍यूत्तर आले नाही. त्यामुळे सरकारच्या मनात नक्की काय चालले आहे, हे समजत नाही. त्यामुळे 15 दिवसात सरकारने गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आमच्याकडे 20-30 हजारांत मिळते", पाकिस्तानमध्ये जुनी 'Alto' चक्क 24 लाखांना, भारतीय नेटकऱ्यांनी घेतली चांगलीच फिरकी Watch Video

VIDEO: सलग 5 चेंडूत 5 बळी! 30 वर्षीय गोलंदाजाचा कहर; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, व्हिडिओ व्हायरल

2027 च्या निवडणुकीत राजकीय घराणी वरचढ ठरताहेत, की पक्षांचे संघटनात्मक कौशल्य ते पाहावे लागेल; सुरक्षित मतदारसंघ आणि सत्तासमीकरण

Trigrahi Yog: मीन राशीत सूर्य, शनी आणि शुक्राची युती; 'त्रिग्रही योग' पालटणार 'या' 3 राशींचे नशीब!

Goan Food Culture: ‘चवीने खाणार, त्याला देव देणार’! बिस्कीट अंबाडे आणि कोळंबूची अविस्मरणीय मैफल

SCROLL FOR NEXT