Mhadei River Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: म्‍हादईच्‍या मुद्यावरून विरोधकांनी फटकारले

Mhadei River: ‘कर्नाटकच्‍या फायद्यासाठी गोवा सरकारचे दुर्लक्ष’

दैनिक गोमन्तक

Mhadei River:

म्‍हादई हातची जाणार नाही, असा दावा गोवा सरकार वारंवार करत असले तरी दुसऱ्या बाजूने कर्नाटक सरकारने कळसाचे पाणी मलप्रभेत वळविण्‍यासाठी कालवा खोदणे सुरू केले आहे; पण गोवा सरकार या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्‍याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर सभागृह समितीची बैठक तातडीने बोलविण्‍यात यावी, अशी मागणीही केली आहे. यासंबंधात सरदेसाई यांनी खोदलेल्‍या कालव्‍याचा व्‍हिडिओ अपलोड करीत केलेल्‍या ट्विटमधून ही गंभीर बाब उघडकीस आणली आहे. म्‍हादईबाबत सरकारने बहिरा, आंधळा आणि मुक्‍याची भूमिका घेतली आहे.

प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकीयाला धक्का बसेल अशा हालचाली कर्नाटकने सुरू केल्‍या आहेत. कळसाचे पाणी मलप्रभा खोऱ्यात वळवण्यासाठी नाल्याचे बांधकाम सुरू केले आहे.

मात्र, कदाचित वरच्‍या इंजिनाच्‍या आदेशावरून गोव्‍यातील खालचे इंजिन गप्‍प बसले असावे, असा आरोप सरदेसाईंनी केला आहे.

कर्नाटकातून लोकसभेत 28 खासदार जातात. त्‍यातील बहुतेक खासदार भाजपचेच असावेत. यासाठी केंद्र सरकारकडून जाणूनबुजून गोव्‍यातील म्‍हादईचा गळा घोटला जातो व गाेवा सरकार त्‍याकडे निर्लज्जपणे पाहत आहे. म्‍हादईच्‍या सद्यस्‍थितीबद्दल सरकारने आपली भूमिका स्‍पष्‍ट करावी.
- विजय सरदेसाई, आमदार
कळसा-भांडुराचे पाणी मलप्रभेत वळविण्‍याचा कर्नाटकाचा डाव साध्‍य झाल्‍यास गोव्‍याला त्‍याची मोठी किंमत चुकवावी लागेल. मागच्‍या पाच वर्षांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना म्‍हादई प्रश्‍न योग्‍यरीत्‍या हाताळता आलेला नाही. म्‍हादई राखून ठेवण्‍यासाठी गाेवा सरकारचे निश्‍चित धोरण काय, हे त्‍यांनी आता स्‍पष्‍ट करण्‍याची गरज आहे.
- व्हेन्झी व्‍हिएगस, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT