IFFI 2025 Goa Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

56th IFFI Opening Ceremony: सिनेप्रेमी आणि देश-विदेशातील कलाकारांना संबोधित करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांचे गोव्यात स्वागत केले

Akshata Chhatre

पणजी: ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) उद्घाटन आज (गुरुवार, २० नोव्हेंबर) पणजी येथे मोठ्या उत्साहात झाले आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव सिनेप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी असणार आहे.

मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल अशोक गजपती राजू, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. एल. मुरुगन, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सिनेप्रेमी आणि देश-विदेशातील कलाकारांना संबोधित करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांचे गोव्यात स्वागत केले.

पर्रीकरांच्या स्मृतींना उजाळा

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी IFFI गोव्यात आयोजित करण्याच्या निर्णयाबद्दल दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सावंत म्हणाले, "२०१४ पासून गोवा हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे घर बनले आहे आणि गोवा तेवढ्याच आत्मीयतेने दरवर्षी सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज असतो." त्यांनी पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कार्निव्हल' आणि गोमंतकीय संस्कृतीचा गौरव

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, यावर्षी IFFI मध्ये गोव्याच्या परंपरांना स्थान दिले जाणार आहे. "यावर्षी IFFI मध्ये कार्निव्हल आणि रोमटामेळ यांसारख्या उत्साही परंपरांचेही सदरीकरण केले जाईल. आम्ही आमच्या पारंपारिक कलाकारांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि आमच्या समृद्ध स्थानिक संस्कृतीला अधोरेखित करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असे त्यांनी सांगितले.

"यावर्षी 'क्लॉडिया' आणि 'पायलट' या दोन गोमंतकीय चित्रपटांची IFFI २०२५ च्या गाला प्रीमियर विभागात निवड करण्यात आली आहे." असे म्हणत त्यांनी गोमंतकीय चित्रपटांसाठी हा अभिमानास्पद क्षण असल्याचे नमूद केले. या उद्घाटनामुळे गोव्यात पुढील नऊ दिवस जागतिक सिनेमाचा आणि स्थानिक संस्कृतीचा मोठा उत्सव अनुभवता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Delhi Indigo Flight: गोवा-दिल्ली फ्लाईटमध्ये पॅनिक अटॅक, देवदूत बनून धावल्या डॉ अंजली निंबाळकर; CPR देऊन वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव! VIDEO

Bike Stunt Video: दुचाकीवरुन 6 पठ्ठ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्स संतापले

गोव्याला नाईटक्लब संस्कृतीची गरज नाही, बेकायदेशीर नाईटक्लब, डान्सबार बंद करण्याची वेळ आलीये; भाजप नेत्याचे वक्तव्य

Goa Accident: पणजीहून वेर्णाकडे जाताना काळाचा घाला! कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, आसामच्या दोघांचा मृत्यू

Suryakumar Yadav: "मी आऊट ऑफ फॉर्म नाही, फक्त...'' तिसरा T20 जिंकल्यानंतर खराब फॉर्मवर 'मिस्टर 360' स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT