Tourists At Goa  Dainik Gomantak
गोवा

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

Goa Tourism: राज्यात सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’ आणि जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शवप्रदर्शन या दोन्ही मोठ्या कार्यक्रमांमुळे गोवा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI 2024, Saint Francis Xavier Exposition Goa

पणजी: राज्यात सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’ आणि जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शवप्रदर्शन या दोन्ही मोठ्या कार्यक्रमांमुळे गोवा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे.

या दोन्ही कार्यक्रमांना देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने राज्यातील, विशेषतः पणजी आणि जुने गोवे येथील हॉटेल्स पूर्णपणे फुल्ल झाली आहेत.

पणजीत २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘इफ्फी’मुळे चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. तर २१ पासून जुने गोवे येथे होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही कार्यक्रमांमुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार असून याचा फायदा पर्यटक उद्योग तसेच आस्थापनांना होणार आहे.

राज्यातील हॉटेल व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कार्यक्रमांमुळे हॉटेल्स पूर्णपणे बुक झाली आहेत. पर्यटकांना आणखी खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना विशेष प्रयत्न करावे लागत आहेत.

‘इफ्फी’, शवप्रदर्शन या दोन्ही सोहळ्यांमुळे गोव्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. विशेषतः या महोत्सवाला येणारे सिनेप्रेमी आणि भाविक राज्यातील इतर ठिकाणांनाही भेट देणार आहेत. हे पर्यटक केवळ किनाऱ्यावरच नव्हे तर इतर अंतर्गत पर्यटन स्थळांनाही भेट देणार आहेत.

यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे मत पर्यटन उद्योजकांनी व्यक्त केले आहे. या मोठ्या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर सुरक्षा व्यवस्था देखील उभारली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणांनाही तैनात करण्यात आले आहे.

पोलिस यंत्रणा सज्ज; आलोक कुमार

जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर शवप्रदर्शन सोहळा तसेच ‘इफ्फी’ हे दोन्ही इव्हेंट एकाचवेळी सुरू होत असली तरी पोलिस यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवण्यास सर्व ती तयारी ठेवली आहे. सुमारे १५०० पोलिस शवप्रदर्शन सोहळ्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

महत्वाच्या कामाव्यतिरिक्त या काळात सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी इंडियन रिझर्व्ह बटालियन (आयआरबी) पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.

शवप्रदर्शनाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात भाविक व यात्रेकरूंची उपस्थिती लाभणार आहे, त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे पोलिसांच्या छावण्याही उभारल्या आहेत.

अनेक बॉलिवूड स्टार्स येणार असल्याने त्यांना सुरक्षेसाठी पोलिस सुरक्षा विभाग सक्रिय झाला आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.

पर्यटकांची गर्दी; यंत्रणेवर ताण शक्य

‘इफ्फी’ दरवर्षी होते. परंतु दहा वर्षांतून एकदाच पार्थिव प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या निमित्ताने जगभरातून ख्रिस्ती भाविक येत असतात.

या गर्दीमुळे यंत्रणेवर ताण येतो. या पार्श्‍वभूमीवर सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिव प्रदर्शनाची वेळ बदलणे शक्य नव्हते, परंतु ‘इफ्फी’ची तारीख बदलता आली असती का? अशी विचारणा काहींनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर ईएसजीच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT