ashwin kumar baluja Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: 'पौराणिक कथा मिथक नाहीत, ती तर आपली संस्कृती'; ‘महावतार नरसिंह’च्या दिग्दर्शकाने जागवला परंपरांचा अभिमान

Ashwin Kumar Baluja: आपल्याकडे ज्या पौराणिक कथा सांगितल्या जातात, त्यास अनेकजण मिथक मानतात. परंतु पौराणिक कथा या घडलेल्या आहेत असे मत ‘महावतार नरसिंह’ या ॲनिमेटेट चित्रपटाचे दिग्दर्शक अश्‍विनकुमार यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mahavatar Narasimha Animation Movie Ashwin Kumar Baluja

आपल्याकडे ज्या पौराणिक कथा सांगितल्या जातात, त्यास अनेकजण मिथक मानतात. परंतु पौराणिक कथा या घडलेल्या आहेत. ती आपली संस्कृती आहे. त्यामुळे मी त्यांना आपला पुरातन इतिहास मानतो, असे मत ‘महावतार नरसिंह’ या ॲनिमेटेट चित्रपटाचे पटकथाकार आणि दिग्दर्शक अश्‍विनकुमार भालुजा यांनी सांगितले.

मला माझ्या संस्कृतीचा, येथील परंपराचा अभिमान आहे. अंधराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग त्या दाखवत असल्याने अशा कथांवर आज चित्रपट येणे काळाची गरज आहे. हा चित्रपट ॲनिमेशनवर आधारलेला आहे. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून जबाबदारी अधिक वाढते. एखाद्याने अभिनय चांगला केला नाही तर चित्रपट खराब ठरतो. परंतु अशा प्रकारच्या चित्रपटाच्या यशापयशाची सर्वस्वी जबाबदारी दिग्दर्शकाची असते, असे भालुजा यांनी सांगितले.

अन्‍य भाषांतूनही चित्रपटाचे प्रदर्शन

ॲनिमेशन आधारित चित्रपट हे केवळ लहान मुलांसाठी असतात अशी एक धारणा आहे. परंतु आता हळुहळू ती धारणा बदलत आहे. जगभरात सर्वत्र विविध प्रकारचे ॲनिमेशन आधारित चित्रपट बनविले जातात आणि ते पाहिलेही जातात. ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाला निश्चितपणे चांगला प्रतिसाद लाभणार असून हिंदी, तामिळ आणि इतरही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे भालुजा यांनी सांगितले.

श्री महाविष्णूंच्या अवतारांवर आधारीत सिनेमा

अशा प्रकारच्या थ्रीडी ॲनिमेनशनचा चित्रपट अजून भारतात तयार करण्यात आला नव्हता. हा चित्रपट श्री महाविष्णूंच्या दशावतारातील श्री नरसिंह आणि वराह अवतारांवर आधारीत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सं शोधन करून हा चित्रपट मी बनविला आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी विष्णुपुराण, भागवतपुराण व इतर ग्रंथाचा आधार घेतला आहे. या चित्रपटासाठी जेवढी मेहनत घ्यायला हवी, तेवढी घेतली असल्याने आम्हाला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्‍‍वास भालुजा यांनी व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

IFFI 2024: इफ्फीमध्ये 'एंटरटेनमेंट, सबका हक'! तिकीट न घेता Picture Time; सिनेमागृहाची आगळीवेगळी संकल्पना जाणून घ्या

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT