Mission Political Reservation For ST Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: केंद्रात शिष्‍टमंडळ नेले नाही, तर सभापतींच्‍या घरावर मोर्चा

Goa Politics: मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनने दिला इशारा : मुख्‍यमंत्र्यांनी शब्द न पाळल्‍याचा आरोप

दैनिक गोमन्तक

Goa Politics: गोव्‍यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्‍यासाठी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुलै महिन्यामध्ये झालेल्या अधिवेशनात यासंदर्भात केंद्रात सर्वपक्षीय शिष्‍टमंडळ नेण्‍याचे आश्‍वासन दिले होते. यासंबंधीचा ठराव घेऊन पाच महिने उलटले तरी अद्याप यासंबंधात काहीच हालचाल केलेली नाही, असा आरोप मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन संघटनेने केला आहे.

अधिवेशनात जो ठराव संमत झाला, त्‍याची अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी सर्वस्वी सभापती रमेश तवडकर यांची होती.

राजकीय आरक्षणाची खूप प्रतीक्षा केली. मात्र, येत्‍या सात दिवसांत जर हे शिष्‍टमंडळ केंद्रात नेण्‍यासाठी पावले उचलली नाहीत तर आम्‍ही सभापतींच्‍या घरावर मोर्चा नेणार, असा इशारा आज मडगावात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

यावेळी मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनचे अध्‍यक्ष जुआंव फर्नांडिस, सचिव रूपेश वेळीप, ज्‍येष्‍ठ सल्‍लागार गोविंद शिरोडकर आणि इतर पदाधिकारी उपस्‍थित होते.

...तर परिणाम भोगावे लागतील

सभापती तवडकर हे स्‍वत: एसटी समाजातील असून त्‍यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी पाळायला हवी. मात्र, ते राजकीय बांधिलकीला महत्त्व देतात, असा आरोप फर्नांडिस यांनी केला. सभागृहात कुठलाही ठराव घेतला जातो, त्‍याचे पालन करण्‍याची जबाबदारी सभापतींवर येते.

मागील सहा महिन्‍यांत मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनच्‍या राज्यात वेगवेगळ्‍या ठिकाणी जागृती सभा झाल्‍या असून सरकारने या प्रश्‍नावर चालढकल केल्‍यास त्‍याचे परिणाम त्‍यांना भोगावे लागतील, असा इशारा देण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT