Goa News Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: सांतिनेजमधील ‘ते’ बांधकाम बेकायदा असल्यास हटवणार

Illegal Construction: महापौरांचे आश्‍वासन : ‘वाय’ मार्गाजवळील मिठाई दुकानाचे फलक हटवले

दैनिक गोमन्तक

Illegal Construction: सांतिनेजमधील ‘वाय’ मार्गावरील हमारा स्कूलजवळ कोणतीही परवानगी न घेता बांधकामावर कारवाई करण्यास महापालिकेने आज सुरवात केली आहे. आयुक्त क्लेन मेदेरा यांनी मिठाईच्या दुकानमालकाने लावलेले ॲक्रेलिकचे फलक दुपारी हटविण्यात आले.

दरम्यान, ते बांधकाम बेकायदेशीर असल्यास हटविले जाईल, असे आश्‍वासन महापौर रोहित मोन्सेरात यांनी महापालिकेची बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिले.

सांतिनेजमधील हमारा स्कूलजवळील जागा रस्ता रूंदीकरणात गेलेली असताना आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा ताबा असतानाही तेथे व्यवसाय करणाऱ्या बार (तावेर्न) मालकाने दुकान दुरुस्तीच्या नावाखाली नव्याने दुकानगाळे उभारले.

दुकान दुरुस्तीसाठी महानगरपालिकेचीही त्याला परवानगी घेण्यात आलेली नाही. तरीही हे काम त्या दुकानदाराने रेटून नेले. जून २०२३ पासून त्याने कामाला हळूहळू सुरुवात केली. अखेर सप्टेंबरमध्ये थेट दुकानगाळा मिठाई विक्रेत्याला भाड्याने दिला गेला आणि मिठाई विक्रेत्याने तिथे दुकान सुरू करण्यासाठी हालचालीही सुरू केल्या.

तत्पूर्वी दुकानमालकाने आपल्या जुन्या कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिकेकडे व्यवसाय परवान्यासाठी अर्ज केला. या सर्व घटनांवर दै. ‘गोमन्तक’ने जूनपासून प्रकाश टाकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT