Tamnar Project Dainik Gomantak
गोवा

Tamnar Project: दक्षिण गोव्‍याला ‘तम्नार’कडून वीज न मिळाल्‍यास उत्तरेतून देणार

Tamnar Project: तम्नार प्रकल्पातून दक्षिण गोव्याला वीज न मिळाल्यास उत्तर गोव्यातून ती देण्याची योजना वीज खात्याने तयार करून त्यावर काम सुरू केले आहे.

दैनिक गोमन्तक

Tamnar Project

तम्नार प्रकल्पातून दक्षिण गोव्याला वीज न मिळाल्यास उत्तर गोव्यातून ती देण्याची योजना वीज खात्याने तयार करून त्यावर काम सुरू केले आहे. या प्रकल्पाच्या वीजवाहिन्या जंगल भागातून घालण्यास कर्नाटक सरकारकडून आडकाठी येऊ शकते हे गृहित धरून वीज खात्याने पूर्वीच ही उपाययोजना करून ठेवली होती, अशी माहिती खात्यातील सूत्रांकडून मिळाली आहे.

तम्नार प्रकल्पातून 400 किलो व्होल्ट वीज (एक किलो व्होल्ट म्हणजे एक हजार व्होल्ट) राज्याला उपलब्ध होणार होती. त्यासाठी धारबांदोडा परिसरात एक वीजउपकेंद्र उभारण्यात आले होते. वीज मिळण्याची शाश्वती नसताना हे उपकेंद्र का उभारले अशी टीका विरोधकांकडून सरकारवर करण्यात आली होती.

प्रत्यक्षात सरकारने केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीतून फोंडा ते धारबांदोडा आणि धारबांदोडा ते शेल्डे या उच्चक्षमतेच्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करूनही घेतले आहे.

सरकारने थिवी वीजउपकेंद्राची क्षमता वाढवली आहे. त्याला पूरक म्हणून साळगाव येथे २२० किलो व्होल्टचे वीजउपकेंद्र उभारण्यात येत आहे. थिवी ते फोंडा उच्चक्षमतेच्या वीजवाहिन्याही घालण्यात येत आहेत. पश्चिम ग्रीडमधून जादा वीज उपलब्ध झाली की ती थिवीपर्यंत आणून नंतर फोंडा, शेल्डेमार्गे दक्षिण गोव्याला पुरवण्याचे वीज खात्याचे नियोजन आहे.

अशी आहे योजना

  • पश्‍चिम ग्रीडकडून

  • जादा वीज घेणार

  • थिवी वीज उपकेंद्र अद्ययावत

  • थिवी-फोंडा उच्च

  • क्षमतेची वीजवाहिनी

  • फोंडा-धारबांदोडा वीजवाहिनी

  • धारबांदोडा येथे वीजउपकेंद्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT