CM Dr. Pramod Sawant Dainik gomantak
गोवा

Pilerne Berger Fire : अन्यथा 'बर्जर'चे स्थलांतर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

लोकांसाठी धोकादायक ठरल्यास दंड ठोठावू

गोमन्तक डिजिटल टीम

Pilerne Berger Fire : पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील बर्जर बेकर कोटिंग कंपनीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा अभ्यास करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. (Fire in Goa Paint Factory)

समितीने अहवाल दिल्यानंतर योग्य ती कार्यवाही सुरू केली जाईल. स्थानिकांसाठी ही कंपनी धोकादायक बनल्यास ती स्थलांतरित करण्यात येईल. गरज पडल्यास कारखान्याला दंडही ठोठावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी आज सभागृहात दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तर तासानंतर आमदार मायकल लोबो यांनी हा विषय लक्षवेधीमार्फत मांडला. ते म्हणाले, बर्जर कंपनीच्या फॅक्टरीला लागलेल्या आगीमुळे आजही स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज पुन्हा या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली.

या फॅक्टरीच्या शेजारी अगदी ७० मीटरवर लोकवस्ती आहे. शिवाय आजूबाजूला गावे आणि वाडे आहेत. जेव्हा आग लागली, तेव्हा तेथून कार्बन मोनॉक्साईडसारखे मानवी जीवितास घातक आणि विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. याचा परिणाम इथल्या स्थानिक नागरिकांवर झाला आहे.

दरम्यान ही आग विझवण्यासाठी वापरलेला फोम आणि पाणी यांमुळे या भागातील विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. याशिवाय इथल्या जलस्त्रोतांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे यावर कायमची उपाययोजना करून ही फॅक्टरी या ठिकाणाहून अन्यत्र हलवावी. अन्यथा या स्थानिक लोकांचे स्थलांतर करावे.

याबाबत स्थानिक आमदार केदार नाईक म्हणाले, या फॅक्टरीमध्ये साठवण्यात येणारे रासायनिक पदार्थ नक्की किती आणि कोणते असावेत? याबाबतही निश्चित नियम नाहीत. टर्पेंटाईनसारखे घातक पदार्थ तिथे मोठ्या प्रमाणात ठेवले जातात.

केवळ शॉर्ट सर्किटसारख्या प्रकारामुळे इतकी मोठी आग लागू शकते, यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे याची चौकशी करणे गरजेचे आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून याबाबत कायमचा तोडगा काढावा, असे लोबो म्हणाले.

हे तर ‘टिकिंग टाईम बॉम्ब’

पिळर्ण येथील बर्जर कंपनीला लागलेली आग आणि कुंकळ्ळी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अपघातांचा हवाला देत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उच्च जोखमीच्या उद्योगांना ‘टिकिंग टाईम बॉम्ब’ म्हणून संबोधले.

कळंगुटचे आमदार लोबो यांनी मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव आणि इतर रसायने वापरणारा कारखाना रहिवासी क्षेत्राच्या अगदी जवळ असल्याने तो स्थलांतरित करावा, असे यावेळी सांगितले.

राज्य सरकार राज्यातील सर्व उच्च जोखमीच्या उद्योगांचा आढावा घेणार आहे. यापुढे अशा प्रकारच्या उद्योगांना निवासी वस्तीजवळ परवानगी दिली जाणार नाही.

पिळर्ण येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेऊ असे मुख्यमंत्री. डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT