Mopa International Airport | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport: मोपा’वरील नोकऱ्यांत गोमंतकीयांना प्राधान्य न दिल्यास छेडणार आंदोलन’

विमानतळावर 50 टक्के कर्मचारी स्थानिक तर 50 टक्के परप्रांतीय आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa International Airport: मोपा-पेडणे येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर ५० टक्के कर्मचारी स्थानिक तर ५० टक्के परप्रांतीय आहेत.

आता सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील लोकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

त्‍यावर मुख्यमंत्र्यांनी आपण विचार करू, असे आश्‍वासन दिले आहे. विशेष म्हणजे पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर या शिष्टमंडळासोबत होते आणि हा त्‍यांनी पेडणेवासीय आणि गोमंतकीयांचा केलेला विश्‍वासघात आहे.

या विमानतळावर गोमंतकीयांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते दीपक कळंगुटकर यांनी दिला. येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विमानतळासाठी पेडणेच्या स्थानिकांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत.

त्‍यामुळे नोकऱ्यांमध्‍ये त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. परंतु त्याग करूनही सरकारकडून त्यांना न्याय दिला जात नाही. उलट सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या लोकांना नोकऱ्या देण्याची मागणी करतात.

दु:खाची गोष्ट म्हणजे स्थानिक आमदार, ज्यांनी पेडणेवासींच्या हक्कासाठी लढण्याची गरज होती, ते स्वतः त्या शिष्टमंडळासोबत येतात. हा समस्‍त पेडणेवासीयांचा विश्‍‍वासघात आणि अपमान आहे.

पेडणेतील युवा आणि इतर व्यावसायिक आपल्या हक्कांसाठी सरकारशी झुंज देत असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे, असे कळंगुटकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दारूच्‍या नशेत जेवणाचे ताट उडवले लाथेने; मित्राचा केला खून, मोबोरमधील घटना: काचेची बाटली खुपसली गळ्यात

Konkan Tourism: पर्यटकांसाठी मोठी बातमी! कोकणात मान्सूनची चाहूल, सिंधुदुर्गातील समुद्री पर्यटनाला 'या' तारखेपर्यंत ब्रेक

Goa River Survey: नद्यांचा प्रवाह, पाण्याचा वेगही मोजणार; जल आयोग करणार पाहणी, शुक्रवारपासून सर्वेक्षणाला सुरवात

Vishkumbh Yog 2026: बॉसची नाराजी आणि कटू शब्द ऐकावे लागणार! 3 राशींची वाढणार चिंता; अवकाशात बनतोय 'विष्कुंभ योग'

खरी कुजबुज: मंदिराच्या विकासावर राजकारण?

SCROLL FOR NEXT