Vasco Ganesh fest Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्कोतील अकरा दिवसांच्या बाप्पाचे थाटात विसर्जन

बाप्पा चालले आपल्या गावाला

दैनिक गोमन्तक

गेली दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्यानंतर यंदा राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम उत्साहाने सुरू झाली. अनेक ठिकाणी आकर्षक सजावट व देखावे तयार करण्यात आले होते. गेली दोन वर्षे 2020-2021 कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये उत्साह उमेद दिसला नव्हता. मात्र यंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा उत्साह दिसून आला.

(idol Ganesh faithfully immersed at vasco)

मुरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पूर्वी घरातील गणेशोत्सवाला मोठे महत्त्व होते. तसे आता सार्वजनिक गणेशोत्सवांना देखील आले आहे.मुरगाव तालुक्यात विविध भागात एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. यात कुठ्ठाळी दाबोळी, वास्को आणि मुरगाव अशा चार मतदारसंघात मिळून एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे वगळता यंदा दरवर्षीप्रमाणे यंदाची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी आणि भाविकांनी कंबर कसली व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

मुरगाव तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळापैकी काही जणांनी सात दिवस, नऊ दिवस व अकरा दिवस गणपती ठेवला तर काही मोजकेच 21 दिवसांचा सार्वजनिक गणेश पुजला. गणेश चतुर्थी काळात चोख सुरक्षा बंदोबस्त राहावा यासाठी एकूण 94 पोलीस तैनात करण्यात आले होते. भाविक व इतरांच्या सुरक्षेकरिता शस्त्र, हॉकी टाकी तसेच इतर गोष्टी तसेच क्विक रिएक्शन टीमही नियुक्त केली होती.

दरम्यान आज वास्को, वेर्णा, मुरगाव पोलीस स्थानकाबरोबर बायणा येथील विनायक कला संघाचा तसेच दाबोळी येथील दाबोळीचा राजा, ठाणे कुठ्ठाळी येथील साखळ्यो गणेशोत्सव मंडळाचा सार्वजनिक गणेशाचे दिंडीच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविकांनी आपला सहभाग दर्शविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT