ICAR Goa fish farming Dainik Gomantak
गोवा

खाजनात मत्स्यपालनाला नवी झेप, उत्पन्नवाढीची नवी दिशा; मेरशीत बहुप्रजाती पद्धतीची यशस्वी चाचणी

ICAR Goa fish farming: जुने गोवे येथील भारतीय किनारी कृषी संशोधन संस्थेने मेरशी येथे खाजन जमिनीत मत्स्यपालनाचा प्रयोग यशस्वी ठरल्याची माहिती दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जुने गोवे येथील भारतीय किनारी कृषी संशोधन संस्थेने मेरशी येथे खाजन जमिनीत मत्स्यपालनाचा प्रयोग यशस्वी ठरल्याची माहिती दिली आहे.

नाबार्डच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या “खाऱ्या पाण्याच्या प्रभावाखालील किनारी भागातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेत सुधारणा करण्यासाठी कमी खर्चिक लहान तळ्यांमध्ये बहुप्रजाती मत्स्यपालनाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन” या प्रकल्पांतर्गत हा प्रयोग करण्यात आला होता.

मेरशी ज्योकीम डिसोझा यांच्या सहकार्याने मत्स्यपालनाचा प्रयोग व अंशतः मासेमारी यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमातून खारट सागरी परिस्थितीत शास्त्रीय पद्धतीने तळ्यांचे व्यवस्थापन करून बहुप्रजाती मत्स्यपालनात साध्य झालेली ठोस प्रगती स्पष्टपणे दिसून आली. या मासेमारी कार्यक्रमाला परिसरातील शेतकरीही उपस्थित होते आणि त्यांनी अशा प्रकारच्या मत्स्यपालन पद्धती अवलंबण्याबाबत उत्सुकता दर्शविली असे संस्थेचे म्हणणे आहे.

प्रकल्पस्थळी ३६० चौ.मी. (तळे क्र. १) आणि ३०० चौ.मी. (तळे क्र. २) क्षेत्रफळाची दोन गोड्या पाण्याची तळी तयार करण्यात आली. २६ एप्रिल २०२५ रोजी पहिल्यांदा माशांची पिल्ले सोडण्यात आली. तळे क्र. १ मध्ये कातला (५०), रोहू (५०) आणि पर्लस्पॉट (६०) या माशांच्या ८ ते १० सेमी आकाराच्या पिल्लांचा समावेश करण्यात आला.

तर तळे क्र. २ मध्ये रोहू (३५), पाकू (६०) आणि तिलापिया (६०) यांची पिल्ले सोडण्यात आली. दोन्ही तळ्यांमध्ये सरासरी ०.५ मासे प्रति चौ.मी. अशी घनता राखण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये पूरक स्वरूपात तळे क्र. १ मध्ये पंगासियस (२०) आणि तळे क्र. २ मध्ये रोहू (५०) व पंगासियस (५०) यांची भर घालण्यात आली. ३२९ दिवसांच्या संगोपनानंतर प्रकल्पाची प्रगती व माशांच्या वाढीचे मूल्यमापन करण्यासाठी अंशतः मासेमारी करण्यात आली.

तळे क्र. १ मधून एकूण ८० किलो मासे मिळाले, ज्यामध्ये कातला ४८ किलो, रोहू १८ किलो आणि पंगासियस १४ किलो यांचा समावेश होता. तळे क्र. २ मधून ६२ किलो मासे मिळाले, ज्यात पाकू २३ किलो आणि पंगासियस ३९ किलो होते.

या उत्पादनानुसार तळे क्र. १ साठी सुमारे २.२ टन प्रति हेक्टर आणि तळे क्र. २ साठी २.० टन प्रति हेक्टर इतकी उत्पादकता नोंदविण्यात आली, जी सध्याच्या परिस्थितीत समाधानकारक मानली जाते. ही केवळ अंशतः मासेमारी असल्यामुळे अंतिम उत्पादन यापेक्षा अधिक अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT