North Goa New Collector Dr. Sneha Gite  Dainik Gomantak
गोवा

IAS IPS Transfer: लईराई चेंगराचेंगरी घटनेनंतर बदली केलेल्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांची आता गोव्याबाहेर बदली

Goa News: लईराई यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांची बदली करण्यात आली होती.

Pramod Yadav

पणजी: गृह खात्याने काढलेल्या आदेशात राज्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. या आदेशाअंतर्गत लईराई यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर बदली करण्यात आलेल्या तत्कालिन स्नेहा गिते यांची आता गोव्यातून बाहेर बदली करण्यात आली आहे. याशिवाय विविध आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार, आयएएस अधिकारी यशस्वीनी बी, अश्विन चंद्रू आणि स्नेहा गिते यांची गोव्यातून अरुणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे. तसेच, रमेश वर्मा, अरुण कुमार मिश्रा आणि सुनील अंचिपका यांची दिल्लीला बदली करण्यात आली आहे. तर, आयपीएस अधिकारी ओमवीर सिंग यांची दिल्लीला बदली करण्यात आली आहे.

गोव्यात बदली झालेले अधिकारी

आयपीएस अधिकारी यतिंद्र मराळकर, संजीव गडकर यांची व आयपीएस अधिकारी केशव राम चौरासीया यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे.

शिरगाव येथील लईराई यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांची बदली करण्यात आली होती. गिते यांच्या जागी यशस्वीनी बी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. तर, गिते यांची विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT