Yatish Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa Election:...म्हणून मी निवडणूक लढणार नाही : टीएमसी नेते यतीश नाईक

यतीश नाईक यांनी टीएमसी (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: तृणमूल कॉंग्रेस नेते अ‍ॅड यतीश नाईक यांनी पक्षाने जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्याने नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी टीएमसी (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. आपल्याला डावलून पक्षात नवीन आलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन याद्या जाहीर होऊनही माझे नाव रोखून ठेवले आहे, असा आरोप यतीश नाईक यांनी केला आहे. (TMC Goa Assembly Election 2022)

यतीश नाईक पत्रात लिहितात, गेल्या 15 वर्षांपासून मी साळगाव मतदार संघातील लोकांची सेवा करत आहे. मला इथून उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाले होते. साळगाव मतदारसंघातून (Constituency) निवडणूक (Election) लढवण्याची माझी इच्छा होती. त्यानुसार मी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात देखील केली होती. मतदारांनी माझ्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र पक्षाने जाहीर केलेल्या दोन उमेदवारी यादीत माझे नाव नाही. यामुळे मला पूर्णपणे अपमानित आणि निराश वाटत आहे.

यतीश नाईक पुढे लिहितात, मला याची खंत वाटते की शेवटच्या क्षणाला पक्षात प्रवेश केलेल्या लोकाना उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र मला बाजूला करण्यात आले. यतीश नाईक यांनी
निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT