BJP Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election 2023 : विकासासाठीच भाजपमध्ये आलो : यशवंत माडकर

हरवळेचा विकास करणे हे कर्तव्यच

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळीतील प्रसिद्ध धबधबा असणारे हरवळे ठिकाण ज्या प्रभागात येते, त्या प्रभाग 1 मध्ये पक्षांतर केले तरी मतदार आपल्याच बाजूने राहतील, असा विश्‍वास यशवंत माडकर यांना वाटत आहे.

माडकरांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करीत भाजपच्या गोटात उडी घेतली आहे. आपण विकासासाठी भाजपात आल्याचे त्यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

मतदान केंद्राबाहेर भेटलेल्या माडकरांना आपण विजयी होणार, याची शंभर टक्के खात्री वाटत आहे. या प्रभागात चौरंगी लढत होती; परंतु गितेश माडकर यांनी मतदानाला काही दिवस अगोदरच यशवंत माडकर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे रिंगणात तीन उमेदवार उरल्याने तिरंगी लढत होणार, असे दिसत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे माडकरांच्या विरोधात संतोष हरवळकर, कुंदा माडकर हे कितपत आव्हान उभे करतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल. हरवळे येथील तीर्थक्षेत्राचा विकास करणे हे आपले कर्तव्य आहे.

मंदिराच्या कामासाठी 18 कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्याशिवाय या ठिकाणी सर्व धार्मिक विधीही होत असल्याने या घाटाचा विकास करण्याबरोबरच हे ठिकाण पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे आणायचे आहे, असे माडकर यांनी सांगितले.

मतदान आपल्या बाजूनेच

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या प्रभागाचा कायापालट करणार असल्याचे यशवंत माडकर यांनी सांगितले. 739 मतदारसंख्या असलेल्या या प्रभागातील काही मतदारांचा मृत्यूही मागील काही काळात झाला आहे.

त्यामुळे ही संख्या किमान 710 ते 715 पर्यंत येईल. यातील किमान 80 टक्के मतदान आपल्या बाजूने होईल, असाही विश्‍वास माडकर यांना आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT