Mobile Theft Case Dainik Gomantak
गोवा

Mobile Theft Case: माडानी पर्रा येथे हैदराबादच्या पर्यटकाचा मोबाईल हिसकावला

म्हापसा पोलिसांनी दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदवला

Kavya Powar

Mobile Theft Case: माडानी, पर्रा येथे चालत जाणाऱ्या हैदराबादमधील पर्यटकाच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून नेल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही चोरीची घटना सोमवारी, सकाळी 9.30च्या सुमारास घडली. फिर्यादी बी. एस. वरूण भट (हैद्रराबाद) यांचा हा 19 हजारांचा मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेला.

ही घटना कोकोनट प्लांटेशन जवळ घडली. दोघाही चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते, मात्र ते गाडीवर सुसाट होते.

या अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंसंच्या 356, 379 व 34 कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक रिकी फर्नांडिस हे करीत आहेत. 

दरम्यान, तांबडीमाती - सांतिनेझ येथील मधुबन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज दिवसाढवळ्या चोरांनी दाराचे लॅच (लॉक) तोडून सुमारे ४ लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅटधारक प्रशांत वेरेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Accident: चिंबल महामार्गावर रुग्णवाहिका उलटली; चालक, परिचारिका सुखरूप; अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा

Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

Cutbona Jetty Dengue: कुटबण जेटीवर डेंग्यूचा शिरकाव! 2 मजूर बाधित; आरोग्य खात्याकडून 2.5 हजार मजुरांची तातडीने तपासणी

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीचा 'राजेशाही' प्रवास! बांदा-डेगवे मार्ग अडीच तास ठप्प; हत्ती पुढे अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा मागे

मित्रासोबत बारमध्ये दारू पिली, नंतर खून केला अन् मोबाईल घेऊन यूपीमध्ये फरार; मित्राच्या हत्येप्रकरणी संशयिताचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

SCROLL FOR NEXT