Financial Fraud News From Noida Dainik Gomantak
गोवा

Noida: नवरा बायकोची 'अमीरों की स्कीम' चौपट परताव्याचे आमिष, करोडोंची फसवणूक, गोव्यातही होते कार्यालय

पती-पत्नी पूर्वी वेगवेगळ्या खासगी कंपनीत काम करत होते. मग झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेतून त्यांनी मार्केटिंग कंपनी उघडली.

Pramod Yadav

Financial Fraud News From Noida: मार्केटिंग कंपनी उघडून 4 महिन्यांत चौपट परतावा देण्याच्या बहाण्याने पैसे गुंतवून फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी केल्यानंतर सेक्टर-63 पोलीस ठाण्याने संपूर्ण रॅकेटचा खुलासा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी पूर्वी वेगवेगळ्या खासगी कंपनीत काम करत होते. मग झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेतून त्यांनी मार्केटिंग कंपनी उघडली.

अनेकांनी श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून गुंतवणूक करायला भाग पाडले. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही, असा आरोप या दाम्पत्यावर करण्यात आला आहे. शेकडो लोकांची मूळ रक्कमही परत करण्यात आली नाही.

या दोघांनी देशातील विविध शहरांतील 980 हून अधिक लोकांची 5 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या ताब्यातून 40 लाख रुपये किंमतीच्या दोन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय किशन जैस्वाल आणि रश्मी जयस्वाल अशी आरोपींची नावे आहेत, ते दिल्लीतील संगम विहार येथील रहिवासी आहेत. फ्लॅट खरेदी करून दोघेही सध्या सेक्टर-143 येथील सोसायटीत राहत होते.

आरोपींनी सेक्टर-63च्या एच ब्लॉकमध्ये त्यांचे कार्यालय उघडले होते. उडिवो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड असे त्यांच्या कंपनीला नाव देण्यात आले होते. दाम्पत्य वेबसाइटवरून गुंतवणूक करण्यास इच्छुक लोकांचा डेटा गोळा करायचे. त्यांनी काही कर्मचाऱ्यांना देखील कामावर ठेवले होते. त्यांना 12 ते 20 हजार रुपये पगार दिला जात होता. कोणी नवीन गुंतवणूकदार आणल्यास त्याला प्रोत्साहन म्हणून लगेच कमिशन दिले जात होते.

आरोपी पती-पत्नीविरुद्ध जुलै-2022 मध्ये नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर येथील कार्यालय बंद करून तो फरार झाला होता. पुढील तपासात त्यांच्याविरुद्ध दिल्ली, गोवा, बरेली येथेही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT