Sattari forest death Dainik Gomantak
गोवा

Hunting Accident Goa: शिकारीचा नाद जीवावर बेतला; अडवई, सत्तरीत गोळी लागून युवकाचा मृत्यू

Youth killed hunting: गोळीबार आणि त्यातून हेमंत याचा झालेला मृत्यू ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pramod Yadav

सत्तरी: शिकारीसाठी जंगलात गेलेल्या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना अडवई, सत्तरी येथे उघडकी आली आहे. युवक इतर काही जणांसोबत शिकारीसाठी जंगलात गेला होता त्यावेळी ही घटना घडली, अशी माहिती मिळतेय. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले आहे.

हेमंत देसाई (वय ३२, अडवई, सत्तरी) असे गोळी लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या अभिजीत देसाई याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोळीबार आणि त्यातून हेमंत याचा झालेला मृत्यू ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

यापूर्वी देखील पाटवळ सत्तरी येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती. शिकारीसाठी गेले असता झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच, पोलिसांनी भागातील घरांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर याच तालुक्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

SCROLL FOR NEXT