Pernem railway station Dainik Gomantak
गोवा

Goa: पेडण्यात मजुरांचे लोंढे दाखल

आज पेडणे रेल्वे स्थानकावर (Pernem railway station) आलेल्या रेल्वेतून शेकडो मजुरांचे (Laborers) लोढे पेडणेत दाखल झाले.

दैनिक गोमन्तक

मोरजी - आज पेडणे रेल्वे स्थानकावर (Pernem railway station) आलेल्या रेल्वेतून शेकडो मजुरांचे (Laborers) लोढे पेडणेत दाखल झाले, स्थानकावर सकाळी साडे सातवाजता ट्रेन पटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथून आली , त्यातून आलेल्या मजुरांची कोणतीच तपासणी केली नाही , त्यांनी कोरोनाचे (covid-19) दोन डोस घेतले की नाही, किंवा त्यांच्याकडे निगेटिव्ह सर्टिफिकेट आहे की नाही यांची तपासणी केली नाही. त्यामुळे कोरोनाची भीती तालुक्यात व्यक्त होत आहे.(Hundreds of laborers arrived in Pernem railway station today)

एका बाजूने पत्रादेवी (Patradevi) चेक नाक्यावरून येणाऱ्याना दोन्ही डोस घेतले कि नाही , किंवा कोरोना नेगेटिव्ह सर्टिफिकेट असेल तरच प्रवेश दिला जातो , नाक्यावर कडक तपासणी चालू असतानाच दुसरीकडून रेल्वे मार्गातून येणाऱ्याची कोणीही तपासणी करत नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

रेल्वेतून आज मोठ्या प्रमाणात मजुरांनी पेडणेत प्रवेश केला. सध्या कोरोनाचा काळ असल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .एका बाजूने कर्फ्युचे तीन तेरा वाजवले जातात तर दुसऱ्या बाजूने मजुरांचे लोढे आले, त्यांची कोणी तपासणी करत नाही .

हे मजूर रेती व्यवसायासाठी, रस्ते इमारती बांधकाम करण्यासाठी आले आहेत .त्यांच्याकडे कोरोनाचे डोस घेतले कि नाही, याची तपासणी कोण करणार, त्यांच्याकडे आरोग्य कार्ड आहे की नाही याची आता आरोग्य निरीक्षकांनी शापोरा आणि तेरेखोल नदी किनारी ज्या रेती व्यावसायीकांच्या होड्या झोपड्या आहेत त्या ठिकाणी जावून तपासणी करावी लागेलट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT