Goa Environment |Farm Land Dainik Gomantak
गोवा

Goa Environment: तळे कोरडे पडल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक

नैसर्गिक तळे आटल्याने डिचोली तालुक्यातील कुडचिरे गावातील शेती धोक्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Ponds In Goa Drying up: नैसर्गिक तळे आटल्याने डिचोली तालुक्यातील कुडचिरे गावातील शेती धोक्यात आली आहे. भटवाडी येथे असलेल्या या तळ्याचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी तसेच गावातील शेतीव्यवसायाला पुनर्जीवित करण्यासाठी या तळ्याचा विकास करावा, अशी मागणी गावातील शेतकरी करीत आहेत.

एकेकाळी याच तळ्यातील पाण्यावर गावातील जवळपास दीडशे शेतकरी शेती फुलवत होते. मात्र, हे तळे कोरडे पडल्यापासून शेती करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

पाण्याअभावी गेल्या जवळपास बारा वर्षांपासून गावातील भटवाडी परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक आहे.

दुसऱ्या बाजूने गावातील विहिरीवरही परिणाम जाणवत आहे. भटवाडी परिसरातील मोठा आवाका असलेले हे तळे आता पूर्ण कोरडे पडले असून, त्या ठिकाणी तळे आहे, याची जाणीव होत नाही.

देखभालीकडे दुर्लक्ष

भटवाडी येथील या तळ्यातील पाणी पंपद्वारे सत्तरी तालुक्यात येणाऱ्या पडोसेपर्यंत नेण्यात येत होते. त्यामुळे या तळ्यातील जलसाठा सुरक्षित राहावा म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जलस्रोत खात्यातर्फे उपाययोजना करण्यात येत होती.

मात्र, पडोसेपर्यंत पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर या तळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. आता हळूहळू तळ्याच्या कडा कोसळून त्याची दुर्दशा होत आहे.

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याकडून पाहणी

भटवाडीतील तळ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अलीकडेच या भागाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या तळ्याची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली आहे.

आमदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, जलस्रोत खात्याकडून या तळ्याचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच प्रियंवदा गावकर आणि अन्य पंचसदस्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT