Cashew tree|Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: म्हावळींगेत पठाराला आग; काजूची झाडे भस्मसात

म्हावळींगे येथील 'चारमाळो' या पठाराला लागलेल्या आगीत काजू बागायतीतील शेकडो काजूची झाडे जळून खाक झाली.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: म्हावळींगे येथील 'चारमाळो' या पठाराला लागलेल्या आगीत काजू बागायतीतील शेकडो काजूची झाडे जळून खाक झाली. आगीची ही घटना गुरुवारी घडली. या आगीत तुळशीदास गावकर,अभिजीत परवार यांच्यासह अन्य काजू बागायतदारांचे नुकसान झाले.

ऐन काजू हंगामाच्या प्रारंभीच काजूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने काजू बागायतदार हवालदिल बनले आहेत. काल सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ''नेस्ले'' कंपनीच्या मागच्या बाजूने पठाराला आग लागली. माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासहीत घटनास्थळी धाव घेतली.

लिडींग फायर फायटर राजन परब यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन दुपारी 2.45 वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली. आग नेमकी कशी लागली, याचे नेमके कारण समजू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT