Human Trafficking in Goa Dainik Gomantak
गोवा

Human Trafficking in Goa: गोव्यात जगभरातून मानवी तस्करी

सडेतोड नायक : वेश्‍याव्यवसाय थांबवा अन्यथा पर्यटन होईल ठप्प : अरुण पांडे

दैनिक गोमन्तक

Human Trafficking in Goa: भारतातील 25 राज्यांतून मुलींना गोव्यात आणले जाते. यात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल तसेच दिल्लीतील मुलींचे आहे. याप्रमाणेच नेपाळ, बांगलादेश, मध्य आशियायी देशांतूनही प्रामुख्याने मानवी तस्करी होते, असे अन्याय रहित जिंदगी (अर्ज)चे संस्थापक अरुण पांडे यांनी सांगितले. ते ‘गोमन्तक टिव्ही’वर संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी होते. यासाठी देशभरातील दलाल सक्रिय असून ग्राहकांच्या मागणीनुसार देश-विदेशातील मुली ते येथे पुरवतात, हे अनेकवेळेला पोलिसांच्या छाप्यांतून स्पष्ट झाले आहे. याचा पर्यटनावर विपरित परिणाम होत आहे. यामुळे वेश्‍याव्यवसायाला आळा घालण्यासाठी गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत, असे पांडे यांनी सांगितले.

दरम्यान, पर्यटनवाढीसाठी आम्ही आपल्या मुली व महिलांना धोक्यात घालून महसूल कमवू नये. याचा विचार पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने व्हावा. राज्यात लैंगिक तस्करी बंद होण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रियपणे कार्य करणे गरजेचे आहे. जो व्यक्ती आपल्या वासनेसाठी अशाप्रकारे महिलांची मागणी करणे मोठा गुन्हा आहे; परंतु अशा व्यक्तींवर कारवाई होताना दिसत नसल्याची खंत पांडे यांनी व्यक्त केली.

दलालांनाच होतो फायदा

वेश्‍याव्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते. परंतु या व्यवसायात ज्या महिला गुंतलेल्या असतात त्या महिलांना याचा कोणताच फायदा होत नाही, उलट त्यांचा वापर करून दलाल मोठे होतात. त्यामुळे दलालांना हा व्यवसाय कायदेशीर झालेला हवा आहे, असे मत पांडे यांनी व्यक्त केले.

मानवी तस्‍करी व वेश्‍याव्यवसाय रोखण्यासाठी...

१ महिलांची मागणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.

२ महिलांना या व्यवसायात येण्यापासून रोखावे.

३ ज्या या व्यवसायात आहेत त्याचे पुनर्वसन करावे.

४ दलालांवर कठोर कारवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 3 सख्या बहिणींवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार; रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रकरण उघड

Goa Comunidade Land: हिमाचल प्रदेश सरकारने गोव्याप्रमाणेच कायदा केला, परंतु न्यायालयाने तो अवैध ठरवला; कोमुनिदाद विधेयक

Goa Live News: मुंगुल येथे झालेल्या टोळी हल्ल्याच्या पार्श्वभूमीव दक्षिण गोवा एसपींनी बोलावली बैठक

Goa Kidnapping Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण, गोव्याबाहेर नेण्याचा केला प्रयत्न; संशयितास सशर्त जामीन मंजूर

Mahavatar Narasimha: महावतार नरसिंहचा दमदार जलवा! 17 दिवसांत 213 कोटींचा टप्पा; 'छावा'च्या यादीत झाला समावेश

SCROLL FOR NEXT