Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

Siolim Hudowada Theft: चोरी केलेल्या वस्तूंसह त्या दोघींची चौकशी केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने महिलांनीच त्यांना दोरखंडाने जवळील झाडाला बांधून ठेवले.

Sameer Panditrao

शिवोली : हुडोवाडा-शिवोली परिसरात घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांना चांगलाच धक्का बसला. येथील एका घराच्या परसात घुसून तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या हंड्या चोरताना दोन परप्रांतीय महिलांना स्थानिक रहिवाशांनी रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, हुडोवाडा येथे दोन महिला एका घरात घुसल्या. तिथे काही वस्तू त्यांनी उचलल्या असे स्थानिकांनी सांगितले. चोरी केलेल्या वस्तूंसह त्या दोघींची चौकशी केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने महिलांनीच त्यांना दोरखंडाने जवळील झाडाला बांधून ठेवले.

घटनेची माहिती मिळताच शिवोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलांना पोलिसांच्या ताब्यात घेतले. या दोन्ही संशयित महिला परप्रांतीय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सध्या पोलिसांकडून त्यांच्या ओळखीचा व पूर्वइतिहासाचा तपास सुरू आहे. त्या महिलांचा अन्य कोणत्याही चोरीच्या प्रकरणाशी संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 6,6,6,6,6,6... एका षटकात 38 धावा, 12 चेंडूत ठोकलं अर्धशतक, पाकिस्तानी फलंदाजानं केला कहर; पाहा व्हिडिओ

Karachi Art Council: पाकिस्तानमध्ये बांगलादेशी, हिंदू कलाकारांची धूम! 18 वर्षांनंतर गाजवले स्टेज; कराची महोत्सवात 140 देशांचा सहभाग

Valvanti River: सजवलेल्या 30 नौका, दिव्यांची रोषणाई; विठ्ठलापुरात 'त्रिपुरारी' पौर्णिमेचा जल्लोष

Katrina Kaif Baby Boy: आई-बाबा झाले कतरिना कैफ- विकी कौशल! लग्नाच्या 4 वर्षांनी चिमुकल्याचे आगमन, PHOTO पोस्ट करत दिली माहिती

BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

SCROLL FOR NEXT