Goa Coastal security Dainik Gomantak
गोवा

Goa Coastal Security: नौकाच नाही तर पोलिस गस्त घालणार कशी? गृह खाते आता तरी लक्ष देणार का?

गोव्यातील किनारी सुरक्षेचे तीनतेरा; 5 वर्षांपासून पोलिस बोटीसाठी घेताहेत मच्छिमारांची मदत

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Coastal Security: मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर देशात सागरी किनारपट्टीची सुरक्षा चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर देशाच्या सागरी किनारपट्टीवर अधिक दक्षता घेतली जाऊ लागली होती.

तथापि, गोव्यात आता किनारी पोलिसांकडे गस्तीसाठी नौकाच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या 5 वर्षांपासून पोलिसांकडे नौका नसून गरजेवेळी त्यांना मच्छिमारांची मदत घ्यावी लागत आहे.

गोव्यात राज्याच्या किनारी सुरक्षितेतबाबत ही माहिती समोर आल्यानंतर एकुणच सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. पोलिस गस्तीसाठी मच्छीमारांचे ट्रॉलर्स, छोट्या होड्या, बोटी यावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

इतर अत्याधुनिक उपकरणांचीही या पोलिस विभागाकडे कमतरता आहे. सध्या पोलिसांकडे ज्या बोटी आहेत, त्याद्वारे केवळ नद्यांवरच पाळत ठेवता येणे शक्य आहे.

त्यामुळे सध्या जेव्हा पोलिसांना काही कारवाई करायची असते तेव्हा ते मच्छिमार किंवा बंदरांच्या कॅप्टनना बोटींसाठी विनंती करतात. त्यामुळे पोलिसांची कारवाई पुर्णपणे या लोकांच्या मदतीवर अवलंबून आहे.

पोलिसांकडे नौकाच नसेल तर एखादे गुन्हेगारी कृत्य पोलिस रोखणार कसे? त्यामुळे समुद्रातील नियम उल्लंघनावर कारवाई करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. 2012 मध्ये, गोव्यातील सात किनारी पोलीस ठाण्यांमध्ये 12 टनांच्या सात इंटरसेप्टर पेट्रोलिंग बोटी होत्या.

पण त्या सध्या वापरण्यास योग्य नाहीत. राज्याच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी गृह खात्यानेच आता यात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT