Ulhas Salelkar showing the loss to MLA Gaonkar
Ulhas Salelkar showing the loss to MLA Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Goa: बागायती पुन्हा कशा उभ्या कराव्यात ; बागायतदार उल्हास सालेलकरांची व्यथा

Bhushan Aroskar, Manoday Fadte

सांगे : गतवर्षी पुराच्या पाण्याने (flood) बागायतीची झालेली नुकसान भरपाई मिळाली नसताना यंदाच्या महापुरात त्याच बागायतीची मोठी नुकसानी झाली. बागायतीला (Horticulture) पाणी पुरवठा करणारे पम्पहाऊस मोडून आतील सामान पुराच्या पाण्यात वाहून गेले. अशी नुकसानी दरवर्षी होत राहिली तर बागायती कशा उभ्या कराव्यात असा सवाल गुणेभाट सांगे(Sange) येथील बागायतदार उल्हास सालेलकर यांनी उपस्थित करून सरकारकडून नुकसानी भरपाई मिळत नसल्याची नाराजी आमदार प्रसाद गावकर (MLA Prasad Gaonkar) यांच्याशी व्यक्त केली आहे.

आपली कैफियत आमदारांशी मांडताना बागायतदार उल्हास सालेलकर म्हणाले, गेल्या वर्षीची झालेली नुकसानी झालेल्या भरपाई मिळावी म्हणून कृषीखात्यात हेलपाटे मारले तरीही, नुकसानी मिळाली नाही. यंदाही महापुरात पम्प हाऊसच्या आतील नारळ, सुपारी (Coconut, betel nut) वाहून गेल्याने आपल्याला अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा पम्प हाऊस उभारावे लागणार आहे. याची नोंद घेऊन सरकारने गेल्या वर्षीची आणि यंदाची नुकसान भरपाई (Indemnity) द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, आमदार गावकर यांनी आपण या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT