Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे? जाणून घ्या...

पाणी टंचाई जाणवणार

Akshay Nirmale

Goa Monsoon: गोव्यात मॉन्सून दाखल झाला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. बिपरजॉय वादळामुळे मॉन्सून गोव्यात वेगाने दाखल तर झाला, मात्र गेल्या काही दिवसांत राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

त्याचा परिणाम राज्यातील जलसाठ्यांवर झाला असून धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

पावसाला सुरवात न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेतच पण अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या गोव्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या अंजुणे धरणात केवळ 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

तर आमठाणे धरणात 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. ओपा येथे दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

असा आहे गोव्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

अंजुणे -------------- 3 टक्के

आमठाणे ---------- 41 टक्के

साळावली -------- 21 टक्के

चापोली ----------- 41 टक्के

पंचवाडी ---------- 02 टक्के

गावणे ------------ 36 टक्के

तिलारी------------ 96 टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT