अभिजित पवार, गोवा Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या परिवर्तनाची मुहूर्तमेढ

समृद्ध निसर्ग लाभलेल्या आणि बौद्धिक संपदेची खाण असलेल्या गोव्याचे परिवर्तन आदर्श राज्यव्यवस्थेत करण्यासाठीची मुहूर्तमेढ आज रोवली गेली.

दैनिक गोमन्तक

पणजी: समृद्ध निसर्ग लाभलेल्या आणि बौद्धिक संपदेची खाण असलेल्या गोव्याचे परिवर्तन आदर्श राज्यव्यवस्थेत करण्यासाठीची मुहूर्तमेढ आज रोवली गेली. गोमन्तक - सकाळ माध्यम समूहाचे कार्यकारी संचालक व एपी ग्लोबले -डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित पवार यांनी यासाठी केलेल्या आवाहनाला पेडणेपासून काणकोणपर्यंतच्या शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या साऱ्यांनीच मोठा प्रतिसाद दिला. पाच वर्षांनंतरचा गोवा कसा असावा, याचा आराखडा तयार करून ते ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला.(How Goa should be after five years)

येथे झालेल्या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या परिषदेत युवा वर्ग आणि महिलांच्या सक्रिय सहभागाने गोव्याचे परिवर्तन केले जाऊ शकते. यावर शिक्कामोर्तब करतानाच सहभागी प्रत्येकाने आपण यात आपले योगदान देण्याची तयारी दर्शवली. अभिजित पवार यांनीही महिन्यातून दोन दिवस आपण या कामासाठी देण्यास तयार असल्याचे जाहीर केले. येत्या सात महिन्यांत हे परिवर्तन कसे साध्य केले जाऊ शकते, याविषयीचा नकाशा (रोडमॅप) तयार करण्याचेही ठरवण्यात आले.

यंग इन्स्पिरेशन नेटवर्क

राज्यात 18 वर्षांवरील दोन लाख विद्यार्थी आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्याचे परिवर्तन होऊ शकते. त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी यंग इन्स्पिरेशन नेटवर्क म्हणजेच ‘यीन’ आणि महिलांचे ‘तनिष्का’ या दोन्ही व्यासपीठांच्या माध्यमातून हे काम पुढे नेण्याचेही यावेळी ठरवण्यात आले.

जलयुक्त शिवार योजना

वर्षांनुवर्षे असलेल्या प्रश्नांवर एक-दोन दिवसांच्या बैठकांत उत्तरे सापडणार नाहीत. त्यासाठी प्रयोगशाळा ही संकल्पना राबवायला हवी. पाणी प्रश्नावर तब्बल चाळीस दिवस प्रयोगशाळा पातळीवर काम केले गेले त्यातून यशस्वी जलयुक्त शिवार योजना साकार झाली.

गोवा मुक्तीनंतर अनेक सरकारे आली-गेली, पण प्रश्‍न कायम आहेत. आता गोमंतकीयांनी आपल्याला काय हवे ते ठरवावे, तोच जनतेचा जाहीरनामा असेल. गोवा मुक्तीनंतर जनतेने अनेकांना संधी दिली, आता जनतेने एकमेका साहाय्य करू, या धर्तीवर पुढे जात गोव्यातील प्रश्‍नांवर उत्तरे शोधली पाहिजेत.

-अभिजित पवार, अध्यक्ष, एपी ग्लोबले -डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT