HOUSE OF CHAPORA RESTAURANT RAIDED BY ANJUNA POLICE Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police Drugs Raid: ड्रग्स तस्करी प्रकरणी शापोरातील रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा, आली 'ही' माहिती उघडकीस

गुरुवारी अटक केलेल्या संशयितांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई

Rajat Sawant

Anjuna Police Drugs Raid: गुरुवारी (ता.४) हुडोवाडो-शिवोली येथे हणजूण पोलिसांनी अमली पदार्थ कारवाईत दोघा संशयितांना अटक केली होती. संशयितांची अधिक चौकशी केली असता हाउस ऑफ शापोरा रेस्टॉरंटमध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज हणजूण पोलिसांनी रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला.

याबाबत अधिक माहिती अशी की, हुडोवाडो-शिवोली येथे हणजूण पोलिसांकडून अमली पदार्थ कारवाईत सूरज प्रदीप तोडी (29, दांडा-शिवोली, मूळ बंगळुरू-कर्नाटक) याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून जप्त करण्यात आलेला एलएसडी पेपर्स हणजूण येथील कालिदास ऊर्फ काली मधुकर नाईक (50, सेंट ॲंथनी वाडा, हणजूण) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती सूरज तोडी याने दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित कालिदास याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली. चौकशीअंती हाउस ऑफ शापोरा रेस्टॉरंटमध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली.

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक सहाय्यक, श्वान पथक आणि हणजूण पोलिस स्थानकाचे कर्मचारी यांचा समावेश असलेले पथकाने आज संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला. छाप्यादरम्यान फॉरेन्सिक तपासणीसाठी अनेक संशयित साहित्य जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये अंमली पदार्थ आढळून आल्यास फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे रेस्टॉरंटच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांनी सांगितले.

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी, वैज्ञानिक सहाय्यक कुलभूषण गुप्ता, प्रशाल देसाई पीआय हणजूण, पीएसआय साहिल वारंग आणि हणजूण पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांचा पथकामध्ये समावेश होता. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT