House gutted at Pernem  Dainik Gomantak
गोवा

पेडणे येथील घराला आग; 3 लाखांचे नुकसान

अग्निशमन दलाला 5 लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

दैनिक गोमन्तक

पेडणे: येथील हहरिजन वाड्यामद्धे स्थित घराला रविवारी आग लागली. हे घर चंद्रकांत आणि कृष्णा उगवेकर यांच्या मालकीचे आहे. पेडणे अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाला संध्याकाळी 6.30 वाजता एका घराला आग लागल्याची माहिती देण्यात आली. तत्काळ उपाधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहचले. (Pernem Goa)

दरम्यान, मालक आणि शेजारी घराची आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घरामध्ये धाव घेतली आणि एलपीजी सिलिंडर सुरक्षित ठिकाणी ठेवले. पुढे अग्निशमन दलाने आग विजवण्याचे काम सुरू केले. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी सुमारे दोन तास लागले असल्याची माहिती त्यांनी दिली.

घरातील दोन कपाटे, कपडे साहित्य जळून खाक झाले. सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मालकांनी केला आहे, तर अग्निशमन दलाला 5 लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग (Fire) लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT