Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

पावसात कोसळलेले घर पुन्हा उभं करणार ; सभापती तवडकरांनी आमदारांना केले महत्वाचे आवाहन

दक्षिण गोव्यात यावेळी झालेल्या पावसात विविध ठिकाणी पडझड झाल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे.

Pramod Yadav

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर दक्षिण गोव्यात काणकोण येथे श्रम धाम उपक्रमाअंतर्गत गरीब लोकांना घरे बांधून देत आहेत. अलिकडेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते काही घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरीब लोकांना हक्काचा निवारा उपलब्ध होत आहे.

दक्षिण गोव्यात यावेळी झालेल्या पावसात विविध ठिकाणी पडझड झाल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशाच एका कुटुंबाचा निवारा ध्वस्त झाल्याने त्यांच्यासाठी तवडकरांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

सावर्डे मतदारसंघातील एका गरीब कुटुंबाचे घर पावसाळ्यात कोसळले. नुकतेच या घराची पाहणी आमदार गणेश गावकर आणि सभापती रमेश तवडकर यांनी केली. या कुटुंबाला पुन्हा घर बांधून द्यायचे आहे. श्रमधाम योजनेअंतर्गत या घराची बांधणी केली जाणार असल्याचे तवडकरांनी सभागृहात माहिती दिली.

घर बांधणीसाठी आमदारांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन तवडकरांनी सर्वांनी केली.

तवडकरांनी सभागृहात केले अवाहन

सभापती रमेश तवडकरांनी सर्व आमदारांनी या गरीब कुटुंबाचे घर पुन्हा बांधण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन केले आहे. श्रम धाम योजनेअंतर्गत हे घर बांधले जाईल असे सभापतींनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

SCROLL FOR NEXT