रमेश तवडकर Dainik Gomantak
गोवा

लोलये भागातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

डांबरीकरणाचा शुभारंभ सभापती रमेश तवडकरांच्या हस्ते

दैनिक गोमन्तक

काणकोण: लोलये पंचायत क्षेत्रातील वेगवगळ्या भागातील सुमारे 16 किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा आज सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी लोलयेचे सरपंच सचिन नाईक,पंच व माजी सरपंच अजय लोलयेकर,भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई,महेश नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृंदा सतरकर, त्याचप्रमाणे संजू तिळवे,विनय तुबकी उपस्थित होते.पंचायत क्षेत्रातील माशे ते आगस मार्गे लोलये,लोलये चर्च ते पेडे, त्याचप्रमाणे दापट ते काजळकेर,माड्डीतळप व अन्य रस्त्यांचा समावेश आहे.या रस्त्याच्या डांबरीकरणाचे सर्व सोपस्कार माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी पूर्ण केले होते फक्त विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे डांबरीकरण पूर्ण झाले नाही असे सरपंच सचिन नाईक यांनी सांगितले.

डांबरीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी सभापती रमेश तवडकर यांनी डांबरीकरणाचा प्रस्ताव व सर्व सोपस्कार मागील सरकारच्य कार्यकाळात पूर्ण झाले होते मात्र त्याची कार्यवाही आता होत असल्याचे सांगितले. या डांबरीकरणासठी एकूण 4 कोटी 10 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.यावेळी सभापती तवडकर यांनी पंचायत क्षेत्रातील समस्या जाणून घेतल्या व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT