tea hotel 
गोवा

हॉटेल्स, रेस्टॉरंटस् व मॉल्स आजपासून सुरू 

Dainik Gomantak

पणजी

‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर राज्यामध्ये वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी टाळेबंदीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून निर्बंध घातले आहे. हा आदेश उद्या ८ जूनपासून राज्यात लागू होणार असून १४४ कलमामध्ये शिथिलता देत हॉटेल्स, रेस्टॉरंटस् तसेच मॉल्स उद्यापासून (८ जून) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कामासाठी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लोकांना फिरता येणार नाही. शाळा व महाविद्याये बंद ठेवण्यात आल्या आहेत. 
जिल्हाधिकाऱ्यांनी आज काढलेल्या आदेशात मागील काळात घातलेल्या निर्बंधांचाच समावेश आहे. त्यामध्ये व्यायामशाळा, क्रीडा संकुले, समाज सभागृह, सभागृहे, मद्यालये, सिमेना गृहे व थिएटर्स, जलावतरण, विविध मनोरंजनात्मक, राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कसिनो, क्रुझ बोटी, मल्‍टिप्लेक्स, सार्वजनिक जागेत मद्यपान करण्यास, उद्याने, स्पा व मसाज पार्लर, पान, गुटखा व तंबाखूची विक्री तसेच सेवन करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ खाली कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 
‘कोविड - १९’ चा प्रसार होऊ नये म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने मानक परिचालन सूचना काढली आहे. यासंदर्भात राज्याच्या सुरक्षितेचा 
उल्लेख केला आहे. गोव्यातही या महामारीचा प्रसार गेल्या काही दिवसांत वाढला आहे. त्यामुळे या सूचनेमध्ये शिथिलता करण्यापेक्षा 
ही महामारी रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालणेच योग्य असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Ind vs Pak: मैदानावर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा, पाकिस्तानी गोलंदाजानं डोळं वटारुन पाहिलं; पण धाकड हरमननंही दिलं चोख प्रत्युत्तर Watch Video

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Illegal Beef Trafficking: गोवा-कर्नाटक सीमेवर गोवा पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 1200 किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT